Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

ऐकावं ते नवलच! भर स्टेजवर स्वतःची उलटी विकायला आला व्यक्ती; पाहून चांगलाच चढला न्यायाधीशांचा पारा

‘इंडियाज गॉट टॅलेंट ९’ हा रियॅलिटी टीव्ही शो नुकताच सुरू झाला आहे. या शोचा भाग बनण्यासाठी देशभरातून लोक येत आहेत. जजच्या भुवया उंचवतील असे अनेक प्रतिभावंत होते. तर काही जण असेही होते, ज्यांना स्टेजवर पाहणे जजला आवडले नाही. तुम्हालाही ऐकून आश्रर्य वाटेल की, ‘इंडियाज गॉट टॅलेंट ९’च्या स्टेजवर एक व्यक्ती चक्क आपली उलटी विकण्यासाठी आला होता!

उलटी विकायला आला होता व्यक्ती
आजकाल छोट्या पडद्यावर रियॅलिटी शोची धूम सुरू आहे. दरम्यान, असाच एक शो जबरदस्त चर्चा रंगवत आहे. हा शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट सीझन ९’ आहे, ज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिभा दाखवताना दिसत आहेत. स्पर्धकांची ही प्रतिभा पाहून बादशाह (Badshah), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), किरण खेर (Kirron Kher) आणि मनोज मुनताशीर हे शोचे जज तसेच प्रेक्षक दंग झाले आहेत. त्याचवेळी, नुकताच सेटवर असा एक अनोखा स्पर्धक आला होता, ज्याच्या कारनाम्यावर किरण यांना खूप राग आला. या स्पर्धकाने जजला त्याची उलटी २०० रुपयांना विकण्यास सुरुवात केली. (a person came indias got talent to sell his vomit kirron kher got angry)

उलटी करून बनवलं गोळ्याचं पाणी
खरं तर, अलीकडेच, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ सीझन ९च्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये एक सूट-बूट घातलेला माणूस ड्रिंक्सने भरलेली गाडी घेऊन येतो. या हातगाडीवर लिहिले आहे, एमजे गोळावाला. जेव्हा बादशाहने दर विचारला, तेव्हा स्पर्धक म्हणाला की, एका गोळ्याचे २०० रुपये. हे ऐकून सर्वजण थक्क झाले. गोळा इतका महाग का आहे असे विचारल्यावर स्पर्धक म्हणतो की, तो गोळ्यासाठी अनोख्या पद्धतीने पाणी तयार करतो. यानंतर, तो स्पर्धक एकापाठोपाठ एक ड्रिंक पित राहतो आणि नंतर हे सर्व ड्रिंक एका जारमध्ये उलटीद्वारे बाहेर काढतो.

किरण खेर यांना आला राग
या स्पर्धकाचा पराक्रम पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आणि किरण खेर चांगल्याच संतापल्या. किरण म्हणाल्या, “आम्ही हा पराक्रम पाहू शकत नाही, २०० रुपयांना उलट्या विकतोय. तेही सूट-बूट घालून. पंजाबीत याला ‘दुर फिट्टे माऊथ’ म्हणतात.” किरण यांचे बोलणे ऐकून सगळे हसत असताना किरण यांच्या चेहऱ्यावर फक्त नाराजी पाहायला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा