जगभरात अनेक दिग्गज गायक आहेत आणि होऊन गेले. त्यापैकी एक नाव नेहमीच सर्वांच्या ध्यानात राहील असे आहे. ते म्हणजेच जमैकाचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार ‘बॉब मार्ले’. त्यांची नुकतीच जयंती झाली. त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1945 मध्ये जमैका येथे झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवनाशी निगडीत गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
पासपोर्टवर चुकलं होतं नाव
बॉब यांच्या आई- वडिलांनी त्यांचं नाव ‘नेस्टा रॉबर्ट मार्ले’ असं ठेवलं होत. परंतु पासपोर्टवर चुकून त्यांचं नाव “रॉबर्ट नेस्टा मार्ले’ असं झालं होतं. एवढच नाही तर त्यांची जन्म तारीख देखील 6 एप्रिल अशी लागली होती. कारण त्यांच्या आईला त्यांची जन्मतारीख नोंदवण्यास थोडा उशीर झाला होता.
भारतात होते चांगलेच लोकप्रिय
बॉब यांच्या भारतातील लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही यावरू लावू शकता की, अनेक ठिकाणी त्यांच्या नावाचे टी-शर्ट आणि पोस्टर्स विकायला असतात. बॉबने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 1963 साली ‘द वेलर्स ग्रुप’ यांच्यासोबत केली. खूप संघर्ष केल्यानंतर 1977 नंतर त्यांचा ‘एक्सोडस’ हा सोलो अल्बम रिलीझ झाला. त्यानंतर त्यांनी सगळे रेकॉर्ड्स तोडून टाकले. त्यांच्या या अल्बमच्या जवळपास 7.5 करोड प्रती विकल्या गेल्या आहेत.
हातांच्या रेषा वाचून सांगायचे भविष्य
बॉबबद्दल ही गोष्ट कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण बॉब हाताच्या रेषा पाहून भविष्य सांगायचे. आधी तर या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. परंतु नंतर जाऊन जेव्हा त्यांनी सांगितलेली एकेक गोष्ट खरी होऊ लागली, तेव्हा त्यांच्या आईला या गोष्टीवर विश्वास बसला. पण नंतर त्यांनी या गोष्टी सोडून दिल्या आणि ते गायक बनले.
जगातील समस्या आपल्या गाण्यांतून मांडल्या
बॉब यांनी जगातील अनेक समस्या आपल्या गाण्यांतून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांची गाणी ऐकून प्रेक्षक बॉब यांचे राहणीमान त्यांचं बोलणं या सगळ्यांशी स्वतःला एकजूट असल्याची भावना मनात ठेवायचे. सगळ्या प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की, बॉब यांचा आवाज एक जादू आहे. जरी कोणी यापासून लांब जायचा विचार केला, तरी कोणी लांब जाऊ शकत नाही.
बॉब मार्ले आणि त्यांचा ‘बैंड वेलर्स’ यांच्या येण्यानंतर रेगे म्युझिकला दुनियेच्या कानाकोपऱ्यात ऐकलं जातं. पहिल्यांदा रेगे हे म्युझिक जमैकामध्येच ऐकलं जायचं. परंतु आता संपूर्ण जगात त्यांचं म्युझिक ऐकतात. बॉब हे एक खूपच दयाळू व्यक्ती होते. त्यांनी गरिबीचा अनुभव घेतला होता आणि जेव्हा आता त्यांच्याकडे पैसे आले, तेव्हा त्यांनी त्यांच्या काही जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जमैकामध्ये घर घेऊन दिलं.
असा झाला होता त्यांचा मृत्यू
बॉब हे खूपच धार्मिक व्यक्ती होते. 1977 मध्ये फुटबॉल खेळताना जेव्हा त्यांच्या पायाला लागले होते, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना पाय कापून टाकायला सांगितले होते. परंतु बॉब यांनी सगळ्या धार्मिक गोष्टींचा विचार करून डॉक्टरांना नकार दिला. पण नंतर जाऊन तो ट्यूमर खूपच वाढला आणि 11 मे 1981 साली त्यांचा मृत्यू झाला. बॉब यांना त्यांच्या घराच्या गार्डनमध्येच दफन केलं गेलं होते.
हेही वाचा-
वाढदिवसाला हृतिककडूनच चाहत्यांना मोठं गिफ्ट! ‘या’ चित्रपटाची घोषणा, सोबत असणार ही नटी; पाहा व्हिडिओ