Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

BIRTHDAY SPECIAL : अल्लू अर्जुनने वयाच्या दुसऱ्या वर्षी चित्रपटात केले काम, ‘या’ चित्रपटातून केले होते अभिनयात पदार्पण

‘पुष्पा’ या चित्रपटात दमदार अभिनय करून लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा दाक्षिणात्य चित्रपट स्टार अल्लू अर्जुन त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि उत्कृष्ट डान्ससाठी ओळखला जातो. त्याच्या खास स्टाईलमुळे त्याला स्टायलिश स्टार म्हटले जाते. अशातच शनिवारी (8 एप्रिल)ला अल्लू त्याचा 40वा वाढदिवस साजरा करत आहे, चाला तर जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास माहिती…

अल्लू (Allu Arjun) वयाच्या 2ऱ्या वर्षी पहिल्यांदा पडद्यावर दिसला. 1985मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विजेता’ या चित्रपटात तो दिसला होता. त्याच वेळी त्याने 2001 मध्ये ‘डॅडी’ चित्रपटात कॅमिओ केला आणि त्यानंतर 2003 मध्ये ‘गंगोत्री’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

डान्सरसोबत आहे गायक तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण अल्लू एक चांगला डान्सर असण्यासोबतच एक चांगला गायक देखील आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘सर्रेनोडु’ या चित्रपटासाठीही त्याने एक गाणे गायले होते. अल्लू अर्जुन, रकुल प्रीत, कॅथरीन ट्रेसा ‘सर्रेनोडु’मध्ये मुख्य भूमिकेत होते.

7 कोटींच्या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनचा मालक

अल्लू अर्जुनने 2019 मध्ये फॅल्कॉन नावाची सुपर लक्झरी व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली. ज्याचा आतील भाग एखाद्या राजवाड्यासारखा आहे. त्याची किंमत 7 कोटी आहे.

पुस्तके वाचायला आवडतात 

अल्लू हा एक पुस्तक प्रेमी आहे आणि त्याला व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके वाचायला आवडतात, हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्याचे आवडते पुस्तक “हू मूव्ह्ड माय चीज? डॉ. स्पेन्सर जॉन्सन” आहे.

‘आर्या’ने दिली ओळख

अल्लू अर्जुनच्या करिअरला ‘आर्या’ चित्रपटातून ओळख मिळाली हे सर्वांनाच माहीत आहे. पण अल्लू अर्जुन ‘आर्या’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हता हे अनेकांना माहीत नसेल. दिग्दर्शकाला रवी तेजा, नितीन किंवा प्रभास यांना या चित्रपटासाठी साइन करायचे होते. पण तारखांच्या कमतरतेमुळे कोणीही होकार दिला नाही आणि अल्लू अर्जुनला चित्रपट मिळाला. (lesser known facts about pushpa star allu arjun)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पायाला पट्टी बांधलेली असतानाही विराट कोहली थिरकला शाहरुख खानसोबत, व्हिडिओ व्हायरल

आनंदाची बातमी! टेलिव्हिजनविश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता होणार बाबा, हटके पद्धतीने शेअर केली गोड बातमी

हे देखील वाचा