‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारी लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असते. नुकतेच अंकिताने तिच्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. काही वेळापूर्वीच या अभिनेत्रीने सोशल मीडियावर ‘पवित्र रिश्ता २’च्या प्रोमोची झलक दाखवली आहे. हा प्रोमो चाहत्यांसाठी एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. गेल्या वर्षी एकता कपूरने (Ekta Kapoor) तिची सुपरहिट मालिका ‘पवित्र रिश्ता’ एका नवीन कथेसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर लॉन्च केली होती.
सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. ‘पवित्र रिश्ता’च्या ओटीटी व्हर्जनमध्ये शाहीर शेखने (Shaheer Shaikh) मानवची भूमिका साकारली, जी चाहत्यांनीही मनापासून स्वीकारली. मानव आणि अर्चना या मालिकेत एक होऊ शकत नाहीत. आता निर्मात्यांनी नवीन सीझनद्वारे या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु हे इतके सोपे आहे का?
विवेक दहियाच्या एन्ट्रीने निर्माण होणार दहशत
लग्न मोडल्यानंतर मानव आणि अर्चना आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करत असल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. दोघेही एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतात आणि दोघांना नोकरीही मिळते. नशीब दोघांना पुन्हा पुन्हा समोर घेऊन येतं. असं काही घडतं की, ते भेटत राहतात. ‘पवित्र रिश्ता सीझन २’मध्ये विवेक दहियाची (Vivek Dahiya) एन्ट्री होणार आहे. या मालिकेत विवेक दहिया राजवीर नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. राजवीरच्या आगमनाने अर्चना आणि मानव यांच्यात आणखी अंतर येईल.
‘या’ दिवशी शो होणार आहे ऑन एअर
‘पवित्र रिश्ता २’चा प्रोमो प्रदर्शित करताना अंकिता लोखंडे हिने आजपासून १० दिवसांनी प्रीमियर होणार असल्याची माहिती दिली आहे. अंकिता लोखंडे, शाहीर शेख आणि विवेक दहिया यांची ही मालिका झी ५ वर २८ जानेवारीला लाँच होणार होती. ‘पवित्र रिश्ता २’चा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही आणि प्रत्येकजण २८ जानेवारीची आतुरतेने वाट पाहत होता.
हेही वाचा :