टिव्हीवर सुंदर ‘नागिन’ बनून सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मौनी रॉयने अलिकडेच तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली आहे. मौनी सूरज नांबियारसोबत लग्न करून मुंबईत परतली आहे. लग्नानंतर मौनी पहिल्यांदाच पती सूरजसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. या खास प्रसंगी मौनी मीडियाचे हात जोडून अभिनंदन करताना दिसली.
अभिनेत्रीने नेसली लाल रंगाची साडी
या खास प्रसंगी मौनीने (Mouni Roy) लाल रंगाची साडी परिधान केली आहे. कानातले मोठे झुमके, हातात मेहंदी आणि भांगेत भरलेला सिंदूर तिच्या लुकमध्ये भर घालत आहे. त्याचवेळी सूरजने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजामा घातलेला दिसला. फोटोंमध्ये, सूरजने काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे, जो त्याच्या लुकला खूप सूट करत आहे.
अभिनेत्री दिसली खूप आनंदी
या व्हिडिओमध्ये मौनी खूपच खूश दिसत आहे. मीडियाला पाहताच अभिनेत्रीने पतीसोबत जोरदार पोझ दिली. यामुळे दोघेही खूप खुश दिसत होते.
दोन रितीरिवाजांनी झाले लग्न
मौनीने बंगाली आणि दक्षिण भारतीय अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
‘या’ ठिकाणी लिहिले पतीचे नाव
मौनीने नुकतेच मेहंदीचे तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनीचा हात मेहंदीने भरलेला दिसत आहे. एका फोटोत मौनीचा हात कॅमेराकडे आहे. ज्यामध्ये मौनीच्या हातावर पती सूरज नांबियारच्या इंग्रजीतील दोन अक्षरे एसएन लिहिलेले होते.
कोण आहे सूरज नांबियार
मौनी रॉय हा इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे, तर सूरज हा या सर्वांपासून दूर असलेला इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. सूरजचा जन्म ६ ऑगस्ट रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथील एका जैन कुटुंबात झाला. त्याचे प्रारंभिक शालेय शिक्षण जैन इंटरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूलमधून झाले. नंतर, २००८ मध्ये त्यांनी बंगळुरूच्या आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग केले. बिझनेसमन असण्यासोबतच सूरज दुबईस्थित इन्व्हेस्टमेंट बँकर देखील आहे. त्याला एक भाऊही आहे. ज्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये सूरज हे सह-संस्थापक आहेत. ही कंपनी पुण्यात आहे.
हेही वाचा :