सध्या सगळीकडे भोजपूरी अभिनेत्रींच्या लूक्स आणि सौंदर्याची चर्चा होताना दिसत असते. या अभिनेत्री आपल्या कसदार अभिनयाने आणि बोल्ड फोटोंनी नेहमीच सोशल मीडियाच वातावरण तापवताना दिसत असतात. यांपैकीच आघाडीची भोजपूरी अभिनेत्री मोनालिसाच्या नव्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकुळ घातलेला पाहायला मिळत आहे.
भोजपुरी चित्रपटांमधून प्रेक्षकांमध्ये प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री मोनालिसा (monalisa) सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या बोल्ड लूकसाठी नेहमीची चर्चेत असलेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली मोनालिसा अनेकदा तिचे फोटो अपलोड करत असते. आता पुन्हा एकदा तिचे साडीतील फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. ती साडीत खूपच मनमोहक दिसत आहे. या व्हायरल फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
तत्पुर्वी मोनालिसा ही आघाडीच्या भोजपूरी अभिनेत्रीपैकी एक आहे. ती पारंपारिक पेहरावासोबक अनेकदा आधुनिक कपड्यांमध्येही फोटो काढताना दिसत असते. तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूपच आवडत असून ते नेहमीच मोनालिसाच्या फोटोवर भरभरुन प्रतिक्रिया देताना दिसत असतात. मुळची बंगालची असलेल्या मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिसवास आहे. तिचा जन्म २१ नोव्हेंबर १९८२ ला कोलकत्त्यामध्ये झाला होता. २०१७ मध्ये मोनालिसाने भोजपूरी अभिनेता विक्रांत सिंगसोबत विवाह केला होता. सध्या ती सोशल मीडियावरील तिच्या मनमोहक फोटोंमुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. तिचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असून इंस्टाग्रामवर तिचे तब्बल ४.९ मिलीयन इतके फॉलोवर्स आहेत. म्हणूनच तिच्या प्रत्येक फोटोवर अवघ्या काही मिनीटातच प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतो.
दरम्यान मोनालिसाने सध्या चित्रपटक्षेत्रापासून लांब राहणे पसंत केले आहे. ती शेवटी ‘नजर’ नावाच्या टीव्ही मालिकेत प्रेक्षकांच्या समोर आली होती, यामध्ये तीने एका हडळीची भूमिका साकारली होती. ती सध्या आपल्या ‘धप्पा’ आणि ‘रात्री के यात्री २’ या आगामी वेबसिरीजच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. याआधी तीने ‘मनी है तो हनी है’, ‘सरकार राज’,’गंगा पूत्र’ ,’काफिला’, सारख्या दमदार हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे.
हेही वाचा :
- बॉलिवूडमध्ये लवकरच उडणार आणखी एका लग्नाचा बार, ‘ही’ लोकप्रिय जोडी अडकणार लग्नबंधनात
- बिग बॉस हरल्यानंतर करण कुंद्राने व्यक्त केली त्याच्या मनातील खंत, म्हणाला ‘जे झालं त्यातून सावरायला मला…’
- गर्ल गँगने मिळून अशाप्रकारे केले अमृता अरोराच्या वाढदिवसाचे सेलेब्रेशन, फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल