Sunday, February 23, 2025
Home अन्य सकाळच्या प्रसन्न वातावरणात हरयाणवी क्वीनची घोड्यावरून रपेट, फॅन्सला आवडला सपनाचा अंदाज

सकाळच्या प्रसन्न वातावरणात हरयाणवी क्वीनची घोड्यावरून रपेट, फॅन्सला आवडला सपनाचा अंदाज

सपना चौधरी (Sapna Choudhary) आपल्या डान्सने सर्वांनाच घायाळ करणारी मातीतली कलाकार. पूर्वी फक्त हरियाणा आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असणाऱ्या सपनाने बिग बॉस शोमध्ये हजेरी लावली आणि तिला संपूर्ण देशात नव्हे नव्हे संपूर्ण जगात ओळख मिळाली. बिग बॉसमुळे सपनाच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आली आणि तिचे नावलौकिक होण्यास सुरुवात झाली. सपनाने तिच्या डान्सने आणि तिच्या अदांनी सर्वच प्रेक्षकांना घायाळ केले आहे. सोशल मीडियावरही सपनाची लोकप्रियता अमाप आहे. तिला सोशल मीडियावर चार मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स असून, अतिशय देशी असणाऱ्या सपनाचा मॉडर्न लूक सोशल मीडियावर बऱ्याचदा पाहायला मिळतो.

नुकताच सपनाने तिचा एक हटके व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये सपनाने एका घोड्यावर बसून, रपेट मारली आहे. या व्हिडिओमध्ये सपनाने अतिशय आकर्षक आणि लक्षवेधी असा राजस्थानी लूक केला असून, यात तिने मस्टर्ड रंगाचा शर्ट तर रेनबो रंगाचा लेहेंगा घातला आहे. डोक्यावर नेटचा मल्टिकलरचा दुपट्टा देखील ओढलेला तिने दिसत आहे. यासोबतच तिने राजस्थानी दागिने घातलेले आहे. याच ड्रेसवर तिने घोड्यावर बसत सैरसपाटा देखील मारला. सपना व्हिडिओमध्ये एका गावात दिसत असून, सकाळची वेळ वाटत आहे, सगळीकडे धुकं पसरलेले असल्याने प्रसन्न वाटत आहे.

या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला बब्बु मानचे पंजाबी ‘पागल शायर’ (Pagal Shayar) गाणे ऐकू येत आहे. घोड्यावर बसलेल्या सपनाने नेटकऱ्यांची मने जिंकली असून, तिने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्याकडे जे काही आहे ते आता आहे” तिचा हा लूक देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. नेहमी हरयाणवी गाण्यांना ओळख मिळवून देणाऱ्या सपनाने तिचा हा व्हिडिओ पंजाबी गाण्यावर शेअर केला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा