Monday, October 27, 2025
Home मराठी ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत होणार अंतराची पहिली संक्रांत साजरी, फोटो आले समोर

‘जीव माझा गुंतला’ मालिकेत होणार अंतराची पहिली संक्रांत साजरी, फोटो आले समोर

टेलिव्हिजनवरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका सध्या जोरदार चर्चेत आहे. मालिकेत एका मागून एक ट्विस्ट येत आहेत. मागील काही दिवसात मालिकेत नकारात्मक ट्रॅक चालू होता. परंतु आता मालिकेत काही आनंदाचे क्षण पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील खूप चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत.

मल्हार आणि अंतराच्या नात्यात आता गोडवा निर्माण होत आहे. एकेकाळी एकमेकांची तोंड देखील न बघणारे दोघे आता एकमेकांच्या प्रेमात रंगात रंगताना दिसत आहे. हळूहळू त्यांच्यात प्रेम निर्माण होत आहे. अंतरा तुरुंगातून सुटून आल्यावर तिचे खानविलकर कुटुंबाने गृहप्रवेश करून तिचे स्वागत केले. तसेच लवकरच आता मालिकेत अंतराची लग्नानंतरची पहिली संक्रांत दाखवली जाणार आहे. (Antra’s first sankranti in jeev majha guntala serial, photo get viral)

अशातच अंतराच्या संक्रांतीचे काही फोटो समोर आले आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, अंतराने सुंदर अशी काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिने हलव्याचे दागिने घातले आहेत. मल्हार आणि अंतरा दोघेही या फोटो आणि व्हिडिओमध्ये खूप खुश दिसत आहेत.

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत सौरभ चौगुले आणि योगिता चव्हाण मुख्य भूमिकेत आहेत. त्यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या भागात काय होणार आहे. हे बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा