Thursday, January 29, 2026
Home बॉलीवूड ‘सनम बेवफा’मध्ये सलमानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण, आता दिसते ‘अशी’

‘सनम बेवफा’मध्ये सलमानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण, आता दिसते ‘अशी’

बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करून आजपर्यंत अनेक अभिनेत्री कुठेतरी गायब झाल्या आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे जी बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत (Salman Khan) ‘सनम बेवफा’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्रीचे नाव चांदनी होते. हा चित्रपट तिच्या काळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता आणि चित्रपट प्रदर्शित होताच चांदनी, जिचे खरे नाव नवोदिता शर्मा (Navodita Sharma) असून, ती एका रात्रीत सेलिब्रिटी बनली. मात्र, पुढे नशिबाने चांदनीला तशी साथ दिली नाही आणि काळाच्या वेगानुसार ही सुंदर अभिनेत्री चित्रपट जगतातून गायब झाली.

आजही अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, ‘सनम बेवफा’ चित्रपटाची चांदणी कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. पण त्याआधी चांदनीच्या आयुष्याशी संबंधित मजेदार किस्सा जाणून घेऊया.

चांदनी शिकत होती तेव्हा एके दिवशी तिने वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली, ही जाहिरात चित्रपट निर्माते सावन कुमार यांनी दिली होती. ही जाहिरात तिच्या आगामी चित्रपटातील नायिकेची होती. ही जाहिरात पाहून चांदनीने ऑडिशन दिले आणि सावन कुमारच्या चित्रपटासाठी तिची हिरोईन म्हणून निवड झाली. या चित्रपटात चांदनीसोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होता.

हा चित्रपट हिट झाल्यानंतर चांदनीने इतरही अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये ‘हिना’ (१९९१), ‘ओमर ५५ की दिल बचपन का’ (१९९२), ‘जान से प्यारा’ (१९९२), ‘१९४२: एक लव्ह स्टोरी’ (१९९३), ‘जय किशन’ (१९९४), ‘ इक्के पे इक्का’ (१९९४), ‘आजा सनम’ (१९९४), ‘मि. आझाद’ (१९९४), ‘हाहाकार’ (१९९६) इ. चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, या अभिनेत्रीला चित्रपटसृष्टीत अपेक्षित यश मिळाले नाही.

माध्यमांतील वृत्तानुसार, चांदनीने १९९६ मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या सतीश शर्मासोबत लग्न केले. लग्नानंतर चांदनी अमेरिकेतील ओरलँडो येथे स्थायिक झाली आणि येथे डान्स अकादमी चालवते.

हेही वाचा-

 

हे देखील वाचा