मराठी चित्रपसृष्टीला अनेक कलाकारांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अनेकांनी केवळ नायकाची भूमिका साकारूनच चित्रपटात अभिनय केला नाही, तर त्यापलीकडे जाऊन अभिनय केला आहे. म्हणजेच अनेक अभिनेते चित्रपटात स्त्रीची भूमिका साकारण्यासाठी देखील मागे पुढे पाहिले नाही. इतकेच नाही, तर स्त्रीची भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. ज्यात अनेक सुपरस्टार अभिनेत्याचा समावेश आहे. चला तर मग या अभिनेत्यांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी आतापर्यंत चित्रपटात स्त्रीची भूमिका साकारली आहे.
प्रसाद ओक (Prasad Oak)
चित्रपट सृष्टीत नावाजलेले नाव म्हणजे अभिनेता प्रसाद ओक होय. प्रसादने मराठीविश्वात आपल्या अभिनयाने उत्तम स्थान निर्माण केले आहे. गायक आणि दिग्दर्शक असलेल्या प्रसादने देखील ‘नांदी’ नाटकात स्त्रीची भूमिका साकारून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
सुबोध भावे (Subodh Bhave)
मराठी चित्रपटसृष्टीत मालिकांसह चित्रपटांत अभिनय करून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा सुबोध भावे देखील याबाबतीत मागे हटला नाही. सुबोधने ‘बालगंधर्व’ या चित्रपटात स्त्रीची भूमिका साकारली होती. जी आतापर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavlkar)
दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या कारकीर्दीत नाटक, मालिका, चित्रपट यांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवला आहे. दिलीप प्रभावळकर यांनी ‘हसवा फसवी’ आणि ‘वासूची सासू’ चित्रपटात स्त्रीची भुमिका साकारली आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde)
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते ज्यांना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावरचं घेतले आहे, ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे होय. लक्ष्मीकांत आज आपल्यात नसतील परंतु त्यांचा अभिनय आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या कारकिर्दीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’ होय. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.
सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar)
सचिन पिळगावकर यांचं नाव घेताच त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक अभिनय डोळ्यासमोर येतो. कारण ते चित्रपटात आपला जीव ओतून काम करत असतात. याचमुळे चित्रपटातील त्यांच्या अभिनयात अगदी जिवंतपणा वाटतो. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरच सचिन पिळगावकर यांनीही ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटात स्त्रीची भूमिका साकारली आहे.
विजय चव्हाण (Vijay Chavan)
दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांनी देखील ‘टांग टिंग टिंगा’ गाण्यात मोरूची मावशी म्हणून स्त्रीची भूमिका साकारली होती.
भरत जाधव (Bharat Jadhav)
दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या ‘मोरूची मावशी’ या नाटकात भरत जाधवने त्यांच्यानंतर स्त्रीची भूमिका साकारली होती.
सुयश टिळक (Suyash Tilak)
मराठी कलाविश्वातील अभिनेता सुयश टिळकने ‘गेट टू गेदर’मध्ये स्त्रीची भूमिका साकारून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.
स्वप्निल जोशी (Swapnil Joshi)
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकरीचे अभिनेत्यांपैकी एक असलेला स्वप्निल जोशी देखील या बाबतीत मागे राहिला नाही. त्याने मराठी चित्रपटसृष्टीला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. स्वप्निल जोशीने ‘तेरे घर के सामने’ या मालिकेत स्त्रीची भूमिका साकारली होती.
हेही वाचा-