टेलिव्हिजन सीरियल ‘अनुपमा’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अनुज म्हणजेच गौरव खन्ना (Gaurav Khanna) याला मुख्य पात्र (अनुपमा) किती आवडतं हे सांगण्याची गरज नाही. पण अनुपमावर जीव ओवाळून टाकणारा अनुज खऱ्या आयुष्यात मात्र दुसऱ्याच व्यक्तीसाठी वेडा झाला आहे. ज्याचा खुलासा नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये झाला आहे.
अनुपमा आणि अनुजची जोडी
‘अनुपमा’ ही टीव्ही मालिका सध्या प्रेक्षकांचा आवडता शो बनली आहे. या शोचा प्रत्येक कलाकार सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. त्याचबरोबर या शोमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या अनुज कपाडियालाही खूप पसंत केले जात आहे. या शोमध्ये अभिनेता गौरव खन्ना अनुज कपाडियाची भूमिका साकारत आहे. ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. तसेच गौरव आणि रुपाली गांगुलीची (Rupali Ganguli) केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडते. त्याचबरोबर हा शो टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र याच दरम्यान गौरव खन्ना आणि त्याची खऱ्या आयुष्यातील पत्नी आकांक्षा चमोला यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
आकांक्षासोबत रोमॅंटिक झाला गौरव
अनुज कपाडिया उर्फ गौरव खन्ना याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये गौरव आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला एका फ्लॅटमध्ये पोहोचल्याचे तुम्ही पाहू शकता. दोघेही या फ्लॅटचा प्रत्येक कोपरा चाहत्यांना दाखवत आहेत. दरम्यान, एका सीनमध्ये दोघेही बाथटबमध्ये झोपलेले दिसत आहेत. त्याचवेळी दोघेही साबणाच्या फेसात लपून बसलेले दिसले. यादरम्यान दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. यावर चाहते सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
आकांक्षानेही केलंय मालिकेत काम
आकांक्षा चमोला ही मुंबईची रहिवासी आहे. २०१५ मध्ये तिने टीव्ही सीरियल ‘स्वरागिनी’ मधून पदार्पण केले. या मालिकेत तिने ‘परिणीता आदर्श माहेश्वरी’ ही भूमिका साकारली होती. यानंतर ती ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतही दिसली. गौरव आणि आकांक्षा यांचे २०१६ साली लग्न झाले होते. आकांक्षा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे हॉट आणि बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
हेही वाचा :