Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

ऐश्वर्या रायसोबत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? आज आहे टेलिव्हिजन विश्वातील सर्वात महाग अभिनेत्री

टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आणि अभिनेते आहेत, ज्यांनी अगदी छोट्या भूमिकांमधून अभिनयाच्या विश्वात पदार्पण केले. त्या भूमिकांमध्ये त्या कलाकरांना तेव्हा ओळख देखील मिळाली नाही, मात्र आता जेव्हा ते छोटे कलाकार मोठे झाले आहेत, तर आज त्यांच्या जुन्या भूमिका खूपच लाईमलाइट मिळवताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात मोठी, प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असलेली जेनिफर विंगेटच्या (Jennifer Winget) एका अशाच भूमिकेबद्दल सांगणार आहोत, जी कोणालाच माहित नसेल.

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (abhishek Bachchan) यांचा ‘कुछ ना कहो’ हा सिनेमा आठवत असेलच याच सिनेमात जेनिफर देखील आहे. आता तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल, या चित्रपटात ती आहे तरी कुठे. जेनिफरचा या सिनेमात इतका छोटा रोल होता तो जास्त कोणाच्या लक्षात देखील आला नाही. तेव्हा जेनिफर जशी दिसायची त्यापेक्षा ती आता खूपच वेगळी दिसते. तिचा लूक एवढ्या दिवसात खूपच बदलला आहे. जेव्हा जेनिफरने मनोरंजनविश्वात पाऊल ठेवले तेव्हा ती केवळ १० वर्षांची होती. तेव्हापासून ती बालकलाकार म्हणून अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकली. जेनिफरने राणी मुखर्जी (Rani Mukherjee), मनीषा कोइराला (manisha Koirala), आमिर खान (Aamir Khan) आदी अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. ‘राजा को राणी से प्यार हो गया’, अकेले हम अकेले तुम, राजा की आयेगी बारात आदी चित्रपटांमध्ये काम केले.

आज जेनिफर टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध आणि मोठा चेहरा बनली आहे. तिने अनेक सुपरहिट आणि मोठ्या मालिकांमध्ये काम केले. बॉलिवूडमध्ये देखील तिने बरेच काम केले, मात्र तिला ओळख टीव्हीनेच दिली. तसे पाहिले तर जेनिफरचे वैयक्तिक आयुष्य तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा अधिक गाजले. जेनिफरची अदा, तिचे सौंदर्य, तिचा अभिनय आदी अनेक गोष्टींसाठी ती ओळखली जाते. ३६ वर्षीय जेनिफरने ‘संगम’, ‘दिल मिल गये’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘बेहद’, ‘बेपनाह’ आदी अनेक मालिकांमध्ये काम केले. तिला सर्वात जास्त लोकप्रियता मिळवून दिली ती ‘दिल मिल गये’ मधील डॉ. रिधिमा गुप्ता या भूमिकेने. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसतच राहिली.

जेनिफरने दिल मिल गये मधील तिचा सह अभिनेता असलेल्या करण सिंग ग्रोव्हरसोबत (Karan Singh Grover) लग्न केले. त्यांचे लग्न फॅन्ससाठी खूपच आनंदचाच विषय होता. मात्र त्यांचे लग्न टिकले नाही आणि त्यांनी काही काळातच घटस्फोट घेतला. आज करणने बिपाशा बसूसोबत लग्न केले असून, जेनिफर देखील तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा