गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज 6 फेब्रुवारीला पहिली पुण्यतिथी आहे. लता मंगेशकर यांनी भारतीय संगीताला आणि गाण्यांना एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी भारतीय संगीत नाव उच्चारले की, लगेचच लता मंगेशकर यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. अर्थात लता मंगेशकर आणि भारतीय संगीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दीदींनी संपूर्ण जगात भारतीय संगीताला आणि गाण्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. दीदी त्यांच्या क्षेत्रात अतिशय उच्च अशा स्थानी विराजमान होत्या. पैसा, प्रसिद्धी, नाव सर्वच त्यांच्या पायाशी होते, तरीही त्यांचे पाय आणि त्यांच्यात असलेली माणुसकी कायमच जिवंत राहिली. त्यांच्या वेगवेगळ्या कृत्यांमधून या गोष्टीची जाणीव जगाला वेळोवेळो होतच गेली. याचाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लता दीदी आणि क्रिकेट यांचे नाते खूपच वेगळे आहे. दीदींचे क्रिकेटवर जीवापाड प्रेम होते. जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने 1983साली पहिल्यांदा कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्टइंडीजला पराभूत करत वर्ल्डकप जिंकला तेव्हा या टीमसाठी लता दीदींनी एक खूपच मोठी आणि अभिमान वाटावा अशी गोष्ट केली होती. चला तर जाणून घेऊया ती गोष्ट. त्या वर्षी बीसीसीआयने लता मंगेशकर यांना भारतीय टीमसाठी एक खास कॉन्सर्ट करण्याचे आमंत्रण दिले, मात्र त्या काही कारणामुळे त्यांनी याला नकार दिला. मात्र प्रश्न देशाचा होता आणि क्रिकेटचा देखील या दोन्ही कारणांमुळे त्या तो कॉन्सर्ट करण्यासाठी तयार झाल्या.
टीम इंडियाने एवढे मोठे कर्तृत्व गाजवले होते मात्र बीसीसीआयकडे टीमच्या खेळाडूंना बक्षीस म्हणून दयायला काही रक्कम देखील नव्हती. संपूर्ण जगात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळख असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाची त्या काली खूपच वाईट परिस्थिती होती. क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असलेल्या एनकेपी साळवे यांना खेळाडूंना काही पुरस्कार द्यायचे होते, मात्र पैशाअभावी काहीच शक्य होत नव्हते.
अखेर बीसीसीआयने लता दीदींकडे या समस्येतून बाहेर पाडण्यासाठी मदत मागितली. तेव्हा लता मंगेशकर यांनी टीम इंडियाचा हा विश्वविजय साजरा करण्यासाठी इंदिरा गांधी इनडोर स्टेडिअममध्ये एक भव्य कॉन्सर्ट आयोजित केला. हा कॉन्सर्ट तुफान गाजला आणि हिट झाला. या कॉन्सर्टमधून त्याकाळी तब्ब्ल 20 लाख रूपये जमा झाले. पुढे त्याच पैशांमधून बक्षीस म्हणून प्रत्येक खेळाडूला एक-एक लाख रूपये देण्यात आले होते.
या कॅन्सरमध्ये दीदींनी त्यांची सर्वच हिट गाणी गायली. मात्,र त्यांनी गायलेले आणि ह्रद्यनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘भारत विश्व विजेता’ हे गीत खूपच गाजले. इंदीवर यांनी लिहिलेल्या या गाण्याला जेव्हा दीदी गात होत्या तेव्हा संपूर्ण भारतीय टीम त्यांच्या सुरात सूर मिसळून हे गीत गाताना दिसली. लता मंगशकर यांनी या कॉन्सर्टसाठी बीसीसीआयकडून एक रुपया देखील घेतला नव्हता. तेव्हा बीसीसीआयने लता दीदींना सांगितले की, त्या जोपर्यंत आहे, तोपर्यंत भारतातील कोणत्याही क्रिकेट सामन्यासाठी त्यांच्यासाठी एक सीट आरक्षित ठेवली जाईल.(lata mangeshkar did a free concert for bcci after india won 1983 world cup)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
गायिकी आधीच लतादीदींनी ठेवले होते अभिनयात पाऊल, बोनी कपूर यांच्या ‘या’ चित्रपटात झळकल्या होत्या गानकोकिळा
मोठी मुलगी पायलट तर धाकट्या मुलीचीही कौतुकास्पद कामगिरी; अलकाजी फोटो शेअर करत म्हणाल्या,…