अभिनेता आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटाने त्या काळात चांगलाच धुमाकुळ घातला होता. चित्रपटाची कथा ,गाणी सर्वांनीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. चित्रपटात आमिर खानच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. याच चित्रपटातील गाजलेले गाणे म्हणजे परदेसी परदेसी जाना नहीं, या गाण्याने तर सर्वांना वेड लावले होते, यामध्ये डान्स करणाऱ्या बंजारी अभिनेत्रीने तर सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र तिच्या खऱ्या आयुष्याची कथा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, काय आहे तिची कथा चला जाणून घेऊ.
‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपट म्हणले की, सर्वांच्या ओठावर येणारे गाणे म्हणजे ‘परदेसी परदेसी जाना नही, मुझे छोडके मुझे छोडके’, या गाण्याने प्रेमवीरांना तर अक्षरशः वेड लावले होते. आजही अनेक ठिकाणी हे गाणे ऐकायला मिळते. गाण्यासोबत त्याचा डान्सही तुफान लोकप्रिय ठरला होता. या गाण्यात आमिर करिश्मा कपूरपेक्षा गाण्यात बंजारनची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने सर्वात जास्त लक्ष वेधले होते. ही अभिनेत्री म्हणजेच प्रतिभा सिन्हा. या गाण्यामुळे प्रतिभा सिन्हाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. अभिनेत्री माला सिन्हाची मुलगी असलेल्या प्रतिभाने अनेक चित्रपटात काम केले आहे, मात्र तिला ‘परदेसी परदेसी’ गाण्याने रातोरात स्टार केले होते. मात्र यशाच्या शिखरावर असलेली ही अभिनेत्री काही काळाने गायबच झाली.
प्रतिभा सिन्हाने जवळजवळ १२ ते १३ चित्रपटात काम केले होते. मात्र तिला अभिनयात यश मिळाले नाही. समोर आलेल्या बातम्यांनुसार प्रतिभा संगीत दिग्दर्शक नदीम सैफी यांच्यासोबत दिर्घकाळ रिलेशनशीपमध्ये होती. ज्यामुळे तिचे संपूर्ण करिअर बरबाद झाले. त्यावेळी प्रतिभा आधीच विवाहित असलेल्या नदीम यांच्या प्रेमात इतकी बुडाली होती की, तिने आपले संपूर्ण करिअर पणाला लावले होते. त्याचवेळी नदीम यांच्यावर गुलशन कुमार यांच्या हत्येचे आरोप लावण्यात आले होते. प्रतिभाच्या आईचा या प्रेमप्रकरणाला सक्त विरोध होता. या प्रेमप्रकरणामुळेच तिचे करिअर उध्वस्त झाले. ती १९९८ मध्ये ‘मिलीर्ट्री’ चित्रपटात शेवटची दिसली होती. यानंतर तिने अभिनयापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. सध्या ती आई माला सिन्हासोबत एकाकी आयुष्य जगत आहे.
हेही वाचा :