‘मैने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) बॉलिवूडमधील सर्वात जास्त गाजलेला आणि ऑल टाईम फेव्हरेट आणि ऑल टाईम हिट असलेल्या या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड रचले. पहिल्याच सिनेमातून सलमान (salman khan)आणि भाग्यश्री (Bhagyashree) या दोघांना न भूतो न भविष्यती असे स्टारडम मिळाले. शिवाय दिग्दर्शक सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) यांना देखील एक मोठी ओळख मिळाली. आज या सिनेमाला प्रदर्शित होऊन तब्ब्ल ३२ वर्ष झाले असले तरी या सिनेमाची जादू कायम आहे. सिनेमातील गाणी, संवाद, सलमान आणि भाग्यश्री यांचा अभिनय सर्वच तुफान लोकप्रिय झाले. सोबतच भाग्यश्री आणि सलमानची जोडी देखील खूपच गाजली.
आता लवकरच भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच तिचा ‘मिथ्या’ नावाचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अवंतिकाने तिच्या आईचा अर्थात भाग्यश्रीचा पहिला सिनेमा असलेल्या ‘मैने प्यार किया’बद्दल एक गोष्ट सांगितली आहे. अवंतिका दासानीने (Avantika Dassani) ‘मैने प्यार किया’ पहिल्यानंतरचा तिचा अनुभव सर्वांना सांगितला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने हा अनुभव शेअर केला आहे.
अवंतिका म्हणाली, “जेव्हा मी पहिल्यांदा हा सिनेमा पाहायला तेव्हा चित्रपट अर्ध्यावरच सोडून मी रूममधून निघून गेली होती. मी माझ्या आईला दुःखी बघू शकत नाही. माझ्या आईचे अश्रू देखील पाहू शकत नाही. सिनेमात तिला रडताना पाहून मी निघून गेली होती. हा सिनेमा मी पहिला तेव्हा खूपच छोटी होती. मात्र त्यानंतर मला जाणवले की, सिनेमा किती खास आणि सुंदर आहे. याच सिनेमासाठी माझ्या आईला संपूर्ण जगात प्रेम मिळते. आता तर मी अनेकदा हा सिनेमा बघते.”
पुढे ती असे देखील म्हणाली की, जेव्हा तुम्ही काही चांगले केले तर इंडस्ट्रीमध्ये पुढील अनेक वर्ष तुमचे नाव काढले जाते. अवंतिकाचा आगामी ‘मिथ्या’ सिनेमा येत्या १८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून, यात अवंतिकासोबत हुमा कुरेशी देखील दिसणार आहे.
हेही वाचा :
- यामी गौतमच्या सस्पेन्स ड्रामा ‘अ थर्सडे’चा टीझर आला समोर, अभिनेत्री दिसली वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये
- शाहरुख खानच्या आधी ‘या’सुपरस्टारला ‘डर’ चित्रपटात ‘राहुल मेहरा’ची भूमिका केली होती ऑफर
- Happy chocolate day : ऋतिक रोशनने भरवला दीपिका पदुकोणला चॉकलेट केक, व्हिडिओ होतोय व्हायरल