चित्रपट क्षेत्रात यंदा लग्नाचा धुमधडाका पाहायला मिळत आहे. कॅटरिना कैफ, मौनी रॉय अशा अनेक आघाडीच्या अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. आता सिनेसृष्टीतील आणखी एका मोठ्या व्यक्तीने लग्न केल्याची बातमी समोर आली आहे.
सिनेसृष्टीतील लग्नाच्या बातम्या काही थांबता थांबेना झाल्यात. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकले असताना आता एक निर्माता लग्नाच्या बेडीत अडकला असून त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचे निर्माते पुनीत बालन यांनी त्यांची गर्लफ्रेंड जान्हवी आर.धारीवालसोबत विवाह केला आहे. जान्हवी आर धारीवाल ही दिवंगत उद्योगपती रसिकलाल धारीवाल यांची कन्या आहे. आपल्या वडिलांच्या निधनानंतर ती माणिकचंद ग्रुप या उद्योग समूहाचे काम पाहत असून ती या कंपनीची सीईओ सुद्धा आहे. जान्हवीला 2009 मध्ये सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
पुनीत बालन आणि उद्योजिका जान्हवीचा शाही विवाह सोहळा पुण्यात पार पडला. दोघेही लग्नाच्या पेहरावात खूपच सुंदर दिसत होते. लग्नात जान्हवीने घातलेल्या पिंक रंगाच्या लेहंग्याने तिचे रूप उठून दिसत होते. पूनीतनेही चॉकलेटी रंगाची शेरवानी घातली होती. यावेळी जान्हवीने महागडे दागिने घातले होते. या लग्नाचे फोटो निर्माते पुनीत बालनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघेही फेरे घेताना दिसत आहेत. फोटोसोबत पुनीतने शेवटी 18 वर्षांनंतर मिसेस बालन” असा कॅप्शन दिला आहे यावरुन दोघेही तब्बल 18 वर्ष रिलेशनशीपमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.
पुनीत बालनने ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातून आपल्या निर्मितीला सुरुवात केली होती. त्यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने जोरदार कमाई केली होती. चित्रपटातील प्रविण तरडेंच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. याच चित्रपटाचा हिंदी रिमेकसुद्धा तयार झाला असून त्यामध्ये अभिनेता सलमान खानने भूमिका साकारली आहे. पुनीत बालन उद्योग समूहाचा तो संस्थापक आहे.
हेही वाचा :