Monday, December 22, 2025
Home बॉलीवूड माधुरी दीक्षितने श्रीराम नेनेसोबत धरला ‘तम्मा तम्मा’ गाण्यावर ठेका, चाहते म्हणाले ‘डॉक्टर तर…’

माधुरी दीक्षितने श्रीराम नेनेसोबत धरला ‘तम्मा तम्मा’ गाण्यावर ठेका, चाहते म्हणाले ‘डॉक्टर तर…’

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या जबरदस्त अभिनयासाठी आणि धमाकेदार डान्ससाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूड जगताला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहे. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. आता माधुरी आणि श्रीराम नेने यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. व्हायरल होत असलेल्या या लेटेस्ट व्हिडिओमध्ये दोघेही माधुरीच्या ‘तम्मा तम्मा’ या सुपरहिट गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. माधुरी बॉलिवूडची डान्सिंग क्वीन म्हणून ओळखली जाते आणि ती अनेकदा आपल्या डान्सने चाहत्यांना प्रभावित करते. मात्र या डान्स व्हिडिओमध्ये माधुरीचा नाही तर डॉ. नेनेच्या डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. होय, या व्हिडिओमध्ये श्रीराम नेने ज्या पद्धतीने ब्रेक डान्स करत आहेत ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

हा व्हिडिओ फिल्मफेअरच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ते शेअर करताना लिहिले आहे की, “जेव्हा माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तुम्हाला डान्स पार्टनर म्हणून भेटेल, तेव्हा तुम्ही नक्कीच काही उत्तम मूव्ह्ज घेऊन याल. काल संध्याकाळी त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत माधुरी दीक्षितसोबत डान्स करताना डॉ. श्रीराम नेने.”

या व्हिडिओमध्ये तुम्ही माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने (Shriram Nene) यांना मॅचिंग काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पाहू शकता. ‘तम्मा तम्मा’ या गाण्यावर डॉ. नेने आपल्या अप्रतिम चाली कशा दाखवत आहेत ते तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सकडून प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत.

व्हिडिओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “डॉक्टर तर डान्सिंग किंग निघाले.” तर दुसर्‍या युजरने लिहिले की, “दोन्ही खूप मोहक आहेत.” त्याचबरोबर चाहते व्हिडिओवर ‘क्यूट’, ‘ब्युटीफुल’, ‘लव्हली’ अशा कमेंट्सही करत आहेत. एकूणच माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्या या सुंदर व्हिडिओवर चाहते खूप प्रेम करत आहेत. यासोबतच माधुरीने या पार्टीमध्ये संजय कपूरसोबत देखील तिच्या ‘अंखिया मिलाऊ’ गाण्यावर भन्नाट डान्स केला.

हेही वाचा

हे देखील वाचा