Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड राखी सावंत चाहत्यांना झाले दुःख, ड्रामा गर्लने घेतला पती रितेशपासून दूर होण्याचा निर्णय

राखी सावंत चाहत्यांना झाले दुःख, ड्रामा गर्लने घेतला पती रितेशपासून दूर होण्याचा निर्णय

नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करून त्यांना खळखळून हसणाऱ्या राखी सावंतने तिच्या चाहत्यांना एक वाईट बातमी दिली आहे. ‘बिग बॉस १५’ दरम्यान राखी सावंतने तिच्या पतीला सगळ्यांशी भेटवले होते. यावेळी राखीचे लग्न झाले आहे असे अनेकांना समजले. अशातच राखीने रितेशपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. राखीने स्वतः इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती सगळ्यांना दिली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ती आणि रितेश वेगळे होणार आहेत.

राखी सावंतने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या प्रिय चाहत्यांना मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, मी आणि रितेशने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉसनंतर खूप काही झाले आहे. मला या सगळ्या गोष्टींचा अजिबात अंदाज नव्हता. जे आता माझ्या नियंत्रणाच्या बाहेर गेल्या आहेत. मी आमच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता मला वाटते आम्ही दोघांनी वेगळे झाले पाहिजे.” (Rakhi sawant separate from Riteish said it was to happen before valenite’s day)

तिने पुढे लिहिले की, “मला खरचं दुःख होत आहे की, हे सगळं व्हॅलेंटाईन डेच्या आधी घडले. परंतु मला हा निर्णय घ्यावा लागला. मला असे वाटते की, रितेशच्या आयुष्यात सगळं काही चांगलचं व्हावं. परंतु आता आयुष्याच्या या वळणावर मला माझ्या कामावर लक्ष द्यायचे आहे. मला फक्त स्वतःला खुश ठेवायचे आहे. मला नेहमीच सपोर्ट करण्याबद्दल आणि समर्थन केल्याबद्दल धन्यवाद.”

राखीने नुकतेच दिलेल्या मुलाखतीत रितेशबाबत काही गोष्टी सांगितल्या होत्या. राखी सावंतने सांगितले होते की, “मी आता याबाबत काहीही सांगू शकत नाही. आता आम्ही फक्त चांगले मित्र आहोत.” जेव्हा तिला विचारले की, “घरात तुम्ही काय आहात? यावर तिने पती पत्नी,” असे उत्तर दिले. तिने दिलेल्या या माहितीमुळे तिच्या चाहत्यांना दुःख झाले आहे. बिग बॉसमध्ये त्यांची जोडी अनेकांना खूप आवडली होती. त्यांच्या जोडीने सगळ्यांचे खूप मनोरंजन केले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा