मराठी (Marathi) सिने-नाट्यसृष्टीतली संवेदनशील अभिनेत्री, कवयित्री अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (spruha joshi). स्पृहाने तिच्या अभिनयाचे कौशल्य अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आणले आहे. मात्र स्पृहाची दुसरी बाजू म्हणजे तिच्यात असलेली एक कवियत्री आणि लेखिका. स्पृहाच्या ‘चांदणचुरा’ या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहासाठी तिला कवी ‘कुसुमाग्रज’ हा मानाचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘लोपामुद्रा’ हा तिचा दुसरा काव्यसंग्रहही चांगलाच गाजला. स्पृहाच्या काही कविता आपल्याला चित्रपटांमध्ये गाण्यांच्या रूपात देखील ऐकायला मिळतात.
स्पृहा जोशी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. याच माध्यमाच्या रूपाने ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. स्पृहाने तिच्या सोशल मीडियाचा वापर ती फक्त स्वतःपुरता आणि प्रसिद्धी मिळवण्यापुरता न करता, समाजपयोगी गोष्टींसाठीही करते. तिने तिचे यूट्यूब चॅनल सुरु केले असून, याच माध्यमातून तिने लोकांचे मनोरंजन तर करते सोबतच त्यांना अनेक गोष्टींसाठी प्रोत्साहित करते, जागरूक करते. ती तिच्या चॅनेलवर कविता वाचन, आवडलेल्या पुस्तकाबद्दल माहिती आदी अनेक गोष्टी करते. स्पृहाच्या या सर्व व्हिडिओंना तुफान प्रतिसात मिळतो.
हे ही बघा: बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमांच्या स्टोरी आहेत ढापलेल्या
नुकताच स्पृहाने तिच्या या यूट्यूब चॅनेलवर एक नवीन व्हिडिओ अपलोड केला असून, हा व्हिडिओ खास आहे. कारण यामध्ये तिने तिच्या ऐका प्रेक्षकाने तिच्याकडे केलेली फर्माइश पूर्ण केली आहे. या व्हिडिओमध्ये स्पृहाने तिची चाहती असणाऱ्या अश्विनी पाटील यांची एक फर्माइश पूर्ण केली आहे. अश्विनी यांनी स्पृहाला मंगेश पाडगावकर यांची ‘आनंदयात्री’ ही कविता वाचून दाखवण्याची विनंती केली होती. तिने देखील आनंदाने ती विनंती मान्य केली आणि या व्हिडिओमध्ये ही सुंदर कविता वाचून दाखवली. या व्हिडिओमध्ये तिने कविता वाचण्यासोबतच सांगितले की, “ही कविता अनेक दुःख पचवणाऱ्या तरीही जगाला फक्त प्रेम देणाऱ्या आणि जगाकडे सुंदर नजेरेतून बघणाऱ्या रसिकाची कविता असल्याचे तिने सांगितले.”
मी आनंदयात्री – मंगेश पाडगांवकर
अफाट आकाश
हिरवी धरती
पुनवेची रात
सागर-भरती
पाचूंची लकेर
कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ
जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री
मेघांच्या उत्सवीं
जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे
घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची
निळी भुलावण
पाशांविण मला
ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री
हलके कढून
कंटक पायींचे
स्वरांत विणिले
सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा
केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें
पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.
‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’, ‘ऐका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘ऐका लग्नाची तिसरी गोष्ट’ सारख्या मालिका, ‘मोरया’, ‘मायबाप’, ‘बायोस्कोप’ आणि ‘पेईंग घोस्ट’ सारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.
हेही वाचा :