Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड शमिता शेट्टी आणि राकेश बापटचा साखरपुडा? ‘या’ ठिकाणी सहकुटूंब स्पॉट झालं जोडपं

शमिता शेट्टी आणि राकेश बापटचा साखरपुडा? ‘या’ ठिकाणी सहकुटूंब स्पॉट झालं जोडपं

चाहत्यांच्या आवडत्या स्टार कपलच्या यादीत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. ते नाव आहे शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहीण आणि ‘बिग बॉस १५’ फेम शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि टीव्ही अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) यांचे. शमिता आणि राकेशच्या अफेअरला अजून बराच वेळ झाला नाही, पण दोघांचं एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे, हे स्पष्टपणे दिसून येतं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर आता राकेश आणि शमिता एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवताना दिसत आहेत.

सध्या हे कपल व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी अलिबागला पोहोचले आहे. येथून राकेश आणि शमिताचा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनाही तो खूप आवडला आहे.

मात्र अलिबागला हे दोघेच गेले नव्हते. मात्र ‘व्हॅलेंटाइन डे’च्या एक दिवस आधी शमिता-राकेश कुटुंबासोबत अलिबागला रवाना झाले. यामुळेच आता मीडियामध्ये त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी शमिता शेट्टीसोबत तिची आई सुनंदा शेट्टीही दिसून आली आहे. इतकेच नव्हे, तर शमिताची बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही आपल्या दोन मुलांसह अलिबागला रवाना झालेली पाहायला मिळाली.

नुकतेच दोघेही मुंबईतील एका ज्वेलरी स्टोअरबाहेर स्पॉट झाले होते. त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी जोर धरला. आता या जोडप्याला कुटुंबासोबत अलिबागमध्ये एकत्र पाहून, या बातम्यांना अधिकच हवा मिळाली आहे. मात्र याबद्दल काहीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

हेही वाचा –

हेही पाहा- 

हे देखील वाचा