Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

Valentine Special | प्रेम- लग्न अनुभवल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी घेतला घटस्फोट, आता सिंगल लाईफ करतायेत एन्जॉय

भोजपुरी इंडस्ट्रीत अनेक कलाकारांनी लव्हमॅरेज केले आहेत. पण यापैकी काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि घटस्फोट झाला. जोडीदारापासून विभक्त झाल्यानंतर काही दुसरे लग्न करून सेटल झाले. तर काही अभिनेत्री घटस्फोटानंतर लग्नापासून दुरावल्या. लग्नानंतर घटस्फोट घेतलेल्या अशा भोजपुरी अभिनेत्रींवर एक नजर टाकूया.

रश्मी देसाई
अभिनेत्री रश्मी देसाईने (Rashmi Desai) १२ फेब्रुवारी २०१२ रोजी ढोलपूरमधील टेलिव्हिजन शोमधील तिचा सहकलाकार नंदिश संधूशी विवाह केला. लग्नानंतर ४ वर्षांनी २०१५ मध्ये त्यांनी वेगळे होण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. रश्मीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात प्रादेशिक चित्रपटांमधून केली. जिथे ती २००२ मध्ये ‘कन्यादान’ नावाच्या आसामी भाषेतील चित्रपटात आणि अगदी अलीकडे ‘बिग बॉस’मध्ये दिसली. ती अरहान खानसोबतही रिलेशनशिपमध्ये होती. पण काही खुलासे झाल्यानंतर तिचा ब्रेकअप झाला. सध्या ती सिंगल स्टेटस एन्जॉय करत आहे.

श्वेता तिवारी
अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) १९९८ मध्ये राजा चौधरीशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आहे. तिचा जन्म २००० मध्ये झाला. लग्नाच्या नऊ वर्षानंतर तिने २०००७ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. श्वेताने सांगितले की, राजाच्या दारूमुळे तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. नंतर, जवळजवळ तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर तिने २०१३ मध्ये अभिनव कोहलीशी लग्न केले. २०१६ मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. पण २०१९ मध्ये तिने कोहलीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. तिच्यावर आणि तिच्या मुलीवर छळ केल्याचा आरोप केला आणि हे जोडपे वेगळे झाले. २ वेळा लग्न मोडल्यानंतर तिने तिचे मन कोणत्याही नात्यात बांधण्याऐवजी सिंगल आयुष्य जगण्याचा आनंद घेत आहे.

पाखी हेगडे
अभिनेत्री पाखी हेगडे (Pakhi Hegde) प्रामुख्याने हिंदी मालिका, भोजपुरी आणि मराठी चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. भोजपुरी अभिनेता उमेश हेगडेशी विवाहबद्ध झाली. त्यांना आशना हेगडे आणि खुशी हेगडे या दोन मुली आहेत. मुंबईत ती आपल्या मुलीसोबत आनंदी जीवन जगत आहे. हेगडेने बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गंगा देवी’ चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्रीने पती उमेशपासून घटस्फोट घेतला आहे आणि तिचे नाव यापूर्वी निरहुआशी जोडले गेले होते. परंतु याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही.

अंजना सिंग
अंजना सिंगने (Anjana Singh) गायक-अभिनेता यश मिश्राशी लग्न केले आणि दोघे अदिती या मुलीचे पालक झाले. लग्नाच्या अनेक वर्षानंतर दोघेही काही वैयक्तिक कारणामुळे वेगळे झाले. सध्या, अभिनेत्री तिच्या मुलीसोबत लखनौमध्ये राहते. तिने अनेक भोजपुरी टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. तिने २०२१ मध्ये ‘एक और फौलाद’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर करिअरला सुरुवात केली.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा