Friday, October 17, 2025
Home साऊथ सिनेमा व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित झाला ‘राधेश्याम’चा रोमँटिक टीझर, पूजा हेगडेला प्रपोज करताना दिसला प्रभास

व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित झाला ‘राधेश्याम’चा रोमँटिक टीझर, पूजा हेगडेला प्रपोज करताना दिसला प्रभास

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा आगामी चित्रपट ‘राधे श्याम’च्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. प्रभासने त्याच्या चाहत्यांना वचन दिले होते की, तो व्हॅलेंटाइन डेला एक मोठे सरप्राईज देणार आहे. आता सोमवारी (१४ फेब्रुवारी) अभिनेत्याने त्याचे वचन पूर्ण केले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ‘राधे श्याम’चा रोमँटिक टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये प्रभास आणि पूजा हेगडेची दमदार केमिस्ट्री स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. या टीझरची खास गोष्ट म्हणजे प्रभास प्रेरणाला म्हणजेच पूजा हेगडेला विक्रमादित्यच्या रूपात रोमँटिक पद्धतीने प्रपोज करताना दिसत आहे.

या टीझरमध्ये प्रभास आणि पूजाच्या रोमँटिक आणि मजेदार सीन्सचा समावेश आहे. जे चित्रपटात दाखवले जाणार आहेत. एका सीनमध्ये प्रभास गुडघ्यावर बसून पूजा हेगडेला प्रपोज करतो. तर दुसऱ्या सीनमध्ये पूजा हेगडे प्रभासला विचारते की, त्याने अजून लग्न का केले नाही. पूजाने प्रभासला प्रश्न केला की, “तू जेवण बनवते आणि वस्तूही बनवते. या हँडसम आणि सभ्य मुलाचे अजून लग्न का झाले नाही? या प्रश्नावर प्रभासचे बोलणे थांबताना दिसत आहे.”

प्रभास आणि पूजा हेगडे यांचा हा चित्रपट राधाकृष्ण कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. या चित्रपटात प्रभास विक्रमादित्य या ज्योतिषाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात पूजा आणि प्रभासशिवाय सचिन खेडेकर, कृष्णम राजू, प्रियदर्शी, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर आणि सत्यन असे अनेक स्टार्स दिसणार आहेत. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगु व्यतिरिक्त, तो कन्नड, मल्याळम आणि हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होईल.

हा चित्रपट १४ जानेवारी २०२२ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवली. त्याचवेळी, आता हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा