बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या ग्लॅमरस फोटोंनी इंटरनेटचा पारा चढवत असते. तिचे एकापेक्षा एक हटके ड्रेस पाहून अनेक मुली तिला फॉलो करतात, तर दुसरीकडे तिचे सौंदर्य पाहून तरुणांच्या काळजात घंटी वाजू लागते. दरम्यान, तिच्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
दिशा ही सोशल मीडिया प्रेमी आहे आणि तिचे फोटो व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट करत असते. आता अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दिशाची लाल रंगाच्या आउटफिटमधील उत्कृष्ट स्टाईल चाहत्यांना वेड लावण्यासाठी पुरेशी आहे. इतकंच नाही, तर दिशाच्या सौंदर्यात सर्वात जास्त भर घालणारी गोष्ट म्हणजे तिचं सुंदर हास्य.
दिशाने तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच तो आगीसारखा पसरू लागला आहे. चाहते तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. वेबी हेअरमधील दिशाची ही किलर स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. दिशा पटानीच्या या सिझलिंग फोटोने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. फोटोमध्ये दिशाची स्माईल पाहून चाहते म्हणत आहेत की, “अशीच स्माईल नेहमी चेह-यावर ठेवा.” लेटेस्ट फोटोमध्ये दिशा पटानीचा एकदम फ्रेश लूक दिसत आहे. फोटोमध्ये दिशा हसत हसत कॅमेऱ्याकडे पोझ देताना दिसत आहे.
दिशा पटानी या फोटोत लाल रंगाच्या ड्रेसमध्ये एकदम चमकत आहे. यामुळेच तिच्या या फोटोला अल्पावधीतच ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तिची इंस्टाग्रामवरही जबरदस्त फॅन फॉलोविंग पाहायला मिळत आहे.
दिशा पटानी तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या व्यावसायिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. ती टायगर श्रॉफसोबत व्हेकेशनवर जात असते. जरी दोघांनी कधीही एकत्र ट्रिपचे फोटो शेअर केले नाहीत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर दिशा पटानी शेवटची सलमान खानसोबत ‘राधे’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. आता ती लवकरच जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूरसोबत एक ‘विलन २’ मध्ये दिसणार आहे. मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
हेही वाचा –
- ‘रंग प्रेमाचा,’ म्हणत सोनाली कुलकर्णीने ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त केले खास फोटो शेअर
- ईशा गुप्ताने इंस्टा स्टोरीला लिहिले असे काही की, चाहतेही पडले विचारात
- जीवाची पर्वा न करता सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्यासाठी मारली होती आगीत उडी, अशी सुरु झाली ही प्रेमकहाणी