हिंदी मालिका क्षेत्रात अशा अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांच्या रिल लाइफपेक्षा रीयल लाइफची खूपच चर्चा होत असते. अलिकडेच तारक मेहता का उल्टा चष्मा मधील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे अडचणीत आली होती. इतकेच नव्हे, तर तिच्यावर जेलमध्ये जाण्याची सुद्धा वेळ आली होती. याआधीही मुनमुन दत्ता आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या राज अनादकट सोबतच्या प्रेमप्रकरणामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाली होती. टीव्ही कलाकारांमध्ये जेलमध्ये जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मुनमुन दत्ता काही पहिली नाही. याआधीही अनेक कलाकारांना विविध गुन्ह्यासंबंधित तुरुंगात जावे लागले आहे. कोण आहेत हे कलाकार चला जाणून घेऊ.
भारती सिंग (Bharti Singh)
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. मागच्या वर्षी हिंदी चित्रपट जगतात रंगलेल्या अंमली पदार्थ सेवन प्रकरणात भारती सिंगही दोषी आढळली होती. या प्रकरणात चौकशी झाल्यानंतर तिला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती.
एजाज खान (Ajaz Khan)
सलमान खानच्या ‘बिग बॉस ७’मध्ये झळकलेला अभिनेता एजाज खानला सुद्धा याच अंमली पदार्थ सेवन प्रकरणात अटक करण्यात आली होती. याआधी २०१८ मध्येही एजाजला या गुन्ह्याखाली पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
अलका कौशल (Alka Kaushal)
अनेक गाजलेल्या मालिकेत काम केलेली लोकप्रिय अभिनेत्री अलका कौशलला ५० लाखाचा चेक बाउन्स झाल्यामुळे दोन वर्षाचा तुरूंगवास भोगावा लागला होता.
करण मेहरा (Karan Mehra)
‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकतून घराघरात पोहोचलेला अभिनेता करण मेहताला सुद्धा जेलची हवा खावी लागली आहे. करण मेहरावर घरगुंती हिंसाचाराचा आरोप करण्यात आला होता, ज्यामुळे त्याला तुरूंगात जावे लागले होते.
पायल रोहतगी (Payal Rohtagi)
अभिनेत्री पायल रोहतगी आपल्या विवादास्पद वक्तव्यामुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकत असते. पायल रोहतगीने गांधी -नेहरु परिवाराबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते, ज्यामुळे तिला तुरूंगात जावे लागले होते.
वीना मलिक (Veena Mallik)
अभिनेत्री वीना मलिक आणि वाद हे प्रकरण काही नवीन नाही. विना मलिकला अपमानास्पद वक्तव्याने तुरुंगाची हवा खायला लागली होती.
पर्ल वी पुरी (Pearl V Puri)
भिनेता पर्ल वी पुरीवर अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करण्याचा गंभीर आरोप लावण्यात आला होता. त्यामुळे त्याला तुरुंगातही जावे लागले होते मात्र आता त्याला निर्दोष सिद्ध करण्यात आले आहे.
श्रुती उल्फत (Shruti Ulfat)
टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध चेहरा असलेल्या श्रुतीला नागासोबत व्हिडिओ पोस्ट करणे चांगलेच महागात पडले होते. याच कारणाने तिला तुरूंगात जावे लागले होते.
हेही वाचा
- सुकेशसोबतच्या वादानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाली जॅकलीन फर्नांडिस, साजरा केला Valentine’s Day!
- बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार ‘गंगूबाई काठियावाडी’चा प्रीमियर, आलिया भट्ट मुंबईहून रवाना
- गोऱ्या-गोऱ्या चेहऱ्यावर दिसली किलर स्माईल, दिशा पटानीच्या जबरदस्त स्टाईलने चाहत्यांना केले घायाळ
हेही पाहा-