हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आपल्या आवाजाच्या जादूने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे बप्पी लहिरी संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक होते. आपल्या दमदार आवाजाने त्यांनी अनेक गाण्यांना लोकप्रिय केले. त्यांच्या आवाजाचे, गाण्यांचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
आपल्या दमदार आवाजाने सगळ्यांना भुरळ घालणारे बप्पीदा आपल्यात नाहीत, हे सत्य पचवणे त्यांच्या चाहत्यांना कठीण जात आहे. बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांचे देशाबाहेरसुद्धा अनेक चाहते होते. गाणी आणि सोने यांसाठी प्रसिद्ध असलेले बप्पीदा त्यांच्या बालपणापासून संगीत क्षेत्रात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून होते. ७०, ८९ आणि ९० च्या दशकातील त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. डिस्को गाण्यांचे तरुणाईला वेड लावणारे पहिले गायक म्हणून बप्पी लहिरी यांचे नाव घेतले जाते.
बप्पी लहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर, १९५२ मध्ये झाला होता. त्यांनी वयाच्या तिसर्या वर्षापासून तबला वादक म्हणून काम केले आणि आपले पहिले गाने वयाच्या चौदाव्या वर्षी गायले. त्यांच्या गळ्यातील सोन्याप्रमाणे त्यांची संपूर्ण कारकीर्द सुद्धा सोनेरी पर्व म्हणून ओळखली गेली.
बप्पीदांनी १९७७ मध्ये चित्रानीसोबत लग्न केले होते. त्यांची मुलगीसुद्धा त्यांच्याप्रमाणेच संगीतकार आहे, तर मुलगा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहे. बप्पी लहिरी यांच्या कुटुंबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची तिसरी पिढीसुद्धा संगीत क्षेत्रात उतरली आहे. त्यांचा नातू स्वास्तिकसुद्धा एक प्रसिद्ध रॅप सिंगर म्हणून ओळखला जातो. त्याने सुद्धा आपल्या आजोबांना आदर्श मानत संगीत क्षेत्रात नाव कमावले आहे. तो त्यांच्यासारखाच दिसतो. बप्पी लहरी यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक किस्से त्यांनी अनेक कार्यक्रमात सांगितले आहेत.
हेही पाहा- सुपरस्टार्ससोबत काम करणारी आंचल सिंग एका वेबसीरिजमुळे आली चर्चेत। Who Is Anchal Singh
बप्पी लहिरी यांच्या गाण्यांनी आजही अनेकांना वेड लावले आहे. ‘यार बिना चैन कहा रे’, ‘तम्मा तम्मा’, ‘दे दे प्यार दे’ यांसारखी त्यांची गाणी संगीत क्षेत्रात कायमची अजरामर झाली. किलोभर सोने घालून मिरवणारे बप्पी लहिरी संगीत क्षेत्रातील सोनेरी पान म्हणून त्यांच्या गाण्यातून कायमचे आठवणीत राहतील. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठे नुकसान झाले आहे, अशीच भावना प्रत्येकजण व्यक्त करत आहे.
हेही वाचा-