कलाकार त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांत तसेच मालिकांमध्ये काम करतात. पण त्यांच्या करिअरमध्ये एखादी अशी मालिका किंवा चित्रपट येतो आणि त्याने कलाकारांना इतकी ओळख मिळते की, ते आयुष्यभरासाठी ती मालिका त्यांच्या नावी होऊन जाते. अशीच झी मराठीवरील एक गाजलेली मालिका म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख होती.
तसं पाहायला गेलं तर या आधी मयुरीने इतर मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. पण या मालिकेतील तिचे पात्र आणि अभिनय प्रेक्षकांच्या खास पसंत पडला होता. तिच्या मानसी नावाच्या पात्राने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यात तिचा तो निरागस चेहरा आणि गोड स्माईल यामुळे तर ती सर्वांचे आकर्षण बनली होती. आजही प्रेक्षकांमध्ये तिची तेवढीच क्रेझ आहे. अशातच तिचा साडी लूक समोर आला आहे. (Mayuri Deshmukh share her beautiful photo on social media)
मयुरीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने जांभळ्या आणि निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. यावर तिने हिरव्या रंगाचा स्लिव्ह लेस ब्लाऊज घातला आहे. कानात झुमके आणि सुंदर अशी हेअर स्टाईल केली आहे.
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खुप आवडत आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोंना आतापर्यंत ११ हजारापेक्षा जास्त लाईक्स आले आहेत.
मयुरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिज्ञा भावे होती. मालिकेतील तिची मानसी नावाची भूमिका चांगलीच गाजली होती. तसेच तिने ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या स्टार प्लस या वाहिनीवरील
‘इमली’ या मालिकेत काम करत आहे.
हेही वाचा :
- कधी नकारात्मक तर कधी सकारात्मक भूमिका साकारून अरुणोदय सिंगने बनवली प्रेक्षकांच्या मनात खास जागा, वाचा
- कधी नकारात्मक तर कधी सकारात्मक भूमिका साकारून अरुणोदय सिंगने बनवली प्रेक्षकांच्या मनात खास जागा, वाचा
- अरे व्वा! तब्बल १२ वर्षांनंतर ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री करणार रजनीकांत यांच्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स?










