Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

मृत्यूनंतर बप्पी लहरी यांचे सोने जाणार तरी कुठे? मुलांनी घेतला ‘हा’ निर्णय

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आपल्या आवाजाच्या जादूने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे बप्पी लहरी संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक होते. आपल्या दमदार आवाजाने त्यांनी अनेक गाण्यांना लोकप्रिय केले. त्यांच्या आवाजाचे, गाण्यांचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांवर आता शोककळा पसरली आहे.

आपल्या दमदार आवाजाने सगळ्यांना भुरळ घालणारे बप्पीदा आपल्यात नाहीत, हे सत्य पचवणे त्यांच्या चाहत्यांना कठीण जात आहे. बप्पी लहरी यांचे देशाबाहेरसुद्धा अनेक चाहते होते. गाणी आणि सोने यांसाठी प्रसिद्ध असलेले बप्पी दा त्यांच्या बालपणापासून संगीत क्षेत्रात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून होते. बप्पी लहरी त्यांच्या गाण्याप्रमाणेच त्यांच्या गळ्यातील सोने आणि चांदीमुळे खास चर्चेत होते. त्यांना सोने घालायला खूप आवडायचे. एक खास नाते त्यांचे या सोन्याच्या दागिन्यांशी झाले होते. थोडे नव्हे, तर तब्बल किलोभर सोने ते आपल्या गळ्यात घालत होते. त्यांच्या या सोन्याचे आता काय होणार, हाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. बप्पी लहरी त्यांच्या गळ्यातील सोन्याला इतके जपायचे की कोणी सेल्फी घ्यायला आले तरी ते जास्त जवळ जात नसत. त्यांच्या या दागिन्यांना कोणी हात लावू नये, अशी त्यांची इच्छा होती. कोणी पाया पडायला आले तरी ते त्याच्यापासून लांब जात होते.

बप्पीदाकडे अनेक सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट, हिरे आणि सोने लावलेल्या अंगठ्या असे अनेक प्रकारची आभूषणे होती. बप्पी लहरी यांची मुले आपल्या वडिलांच्या या आठवणी तशाच जपणार आहेत, त्यामुळे ते या सगळ्या दागिन्यांना सुरक्षित ठेवणार आहेत. समोर आलेल्या बातमीनुसार बप्पीदाच्या शेवटच्या क्षणी त्यांची मुलगी रीमा त्यांच्यासोबत होती. तिच्याशीच ते शेवटचे बोलले आणि त्यांनी मुलीच्याच हातात शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने आता त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा

हेही पाहा-

हे देखील वाचा