अभिनेत्री जिज्ञासा सिंगने (Jigyasa Singh) अलीकडेच ‘थपकी प्यार की २’ या टीव्ही शोचा निरोप घेतला. तिने शो सोडल्याने प्रेक्षकांसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. पण जिज्ञासाकडे तब्येतीच्या समस्येमुळे शो सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. जिज्ञासाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय का घेतला. जिज्ञासाने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून तिला प्रकृतीचा त्रास सुरू होता. याचमुळे तिने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला.
तब्येतीच्या समस्येमुळे सोडला शो
जिज्ञासाने माध्यमांशी केलेल्या संभाषणात सांगितले की, “मी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला कारण गेल्या ४-५ महिन्यांपासून मला काही आरोग्य समस्यांनी ग्रासले आहे. सतत शूट आणि कामामुळे आलेल्या थकव्यामुळे असे घडले, असे मला वाटते. माझ्या काही चाचण्या केल्या गेल्या. त्यानंतर मला समजले की, सतत शूटिंगमुळे मला काही समस्या येत आहेत.”
जिज्ञासा सिंग पुढे म्हणाली की, “मी या महिन्याच्या सुरुवातीलाच निर्मात्यांना माझ्या निर्णयाची माहिती दिली होती. उलट, मी काम करत राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मी निर्मात्यांशीही बोलले की, त्यांनी माझ्या शूटचा वेळ थोडा कमी केला तर. मग माझ्या भावाचेही जयपूरमध्ये लग्न आहे आणि मलाही तिथेच राहावे लागले. मला वाटतं ते माझ्याशिवाय एक आठवडाही व्यवस्था करू शकत नाही. कारण आमच्याकडे जास्त एपिसोड बँक नाही. त्यामुळे इच्छा नसताना हे पाऊल उचलावे लागले. अन्यथा, काहीतरी केले जाऊ शकते.”
शूटिंगच्या शेवटच्या दिवशी झाली भावुक
जिज्ञासाने सांगितले की ‘थपकी प्यार की २’ तिच्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि तो सोडण्याचा निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते. या रविवारी (१२ फेब्रुवारी) तिने शेवटचा एपिसोड शूट केल्याचे सांगितले. तो भावनिक क्षण होता. रविवारी (१२ फेब्रुवारी) तिच्या शूटचा शेवटचा दिवस असल्याचं सांगितल्यावर ती भावुक झाली.
पहिल्या सीझनमध्येही आजारी पडल्याने सोडला शो होता
जिज्ञासा सिंगनंतर आता अभिनेत्री प्राची बन्सल ‘थपकी प्यार की २’मध्ये आपली भूमिका साकारणार आहे. जिज्ञासाने या शोचा पहिला सीझनही मध्येच सोडला होता. मात्र, त्यानंतर तिला स्वाईन फ्लूची लागण झाली. पण ३ आठवड्यांनंतर जिज्ञासा शोमध्ये परतली.
हेही वाचा :
- ‘या’ गायकाला उर्फी जावेद करत आहेत डेट, सोशल मीडिया पोस्ट होतायेत जोरदार व्हायरल
- बप्पी लहरी यांच्या अंत्यसंस्कारवेळी मुलगी रीमाची रडून रडून झाली वाईट अवस्था, मुलगाही झाला भावुक
- दुःखद! मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, सोशल मीडियावर अर्पण होतीये श्रद्धांजली
हेही पाहा-