बॉलिवूड अभिनेत्री तर नेहमीच चर्चेत असतात, पण टीव्ही अभिनेत्रीही आता चाहत्यांचे लक्ष वेधत चर्चेचा विषय ठरत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ‘दिया और बाती हम‘ मालिकेतील ‘संध्या बींदणी’चाही समावेश होतो. ‘संध्या बींदणी’ म्हणजेच दीपिका सिंग होय. दीपिका दरदिवशी ट्रेंडिंग डान्स व्हिडिओ बनवत असते. अशातच तिने नुकताच एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती १९५४ साली प्रदर्शित झालेल्या ‘आर पार’ सिनेमातील ‘कभी आर कभी पार’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत ती एकदम मस्तीच्या मूडमध्ये रस्त्यावरच डान्स करत आहे.
दीपिकाने (Deepika Singh) शेअर केलेल्या या व्हिडिओत शॉर्ट्स परिधान केले आहेत आणि खाली बूट घातले आहेत. ती डान्स करत असलेले गाणे हे एक ब्लॅक एँड व्हाईट गाणे होते. मात्र, दीपिकाने आपल्या अंदाजात त्यावर व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओला जोरदार पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १ लाख लाईक्सचा पाऊसही पडला आहे.
तिचे चाहते या व्हिडिओवर कमेंट्स करून तिचे कौतुक करत आहेत. मात्र, काही युजर्सला तिचा हा व्हिडिओ आवडला नाही. एकाने कमेंट करत लिहिले की, “खूपच बेकार डान्स करतेस तू.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “यापेक्षा तुम्ही कपडेच घालू नका.”
नुकताच दीपिकाने पतीसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती गुरू रंधावाच्या ‘डान्स मेरी रानी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा पती एकाच स्टेपवर डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दीपिका त्यांना थांबवते आणि जेव्हा तो थांबत नाही, तेव्हा ती त्याला लाथ मारते. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मजेशीर व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
‘दिया और बाती हम’ या मालिकेतून दीपिकाला चांगली ओळख मिळाली. या मालिकेत ती संध्या राठी आयपीएस ऑफिसरच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय दीपिका एका सिनेमातही काम करत आहे. तिचा पती या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे.
खूप कमी चाहत्यांना माहिती असेल की, दीपिकाचा पतीच तिच्या ‘दिया और बाती हम’ मालिकेचा दिग्दर्शक होता. दोघेही एकमेकांना आवडायचे. पुढे दोघांनी लग्न केले. दीपिकाकडे सध्या कोणतेही विशेष प्रोजेक्ट नाहीत. ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे.
हेही वाचा-