Thursday, July 24, 2025
Home टेलिव्हिजन ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील ‘हे’ बालकलाकार आता दिसतात कसे आणि करतात काय?, घ्या जाणून

‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील ‘हे’ बालकलाकार आता दिसतात कसे आणि करतात काय?, घ्या जाणून

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील २००० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणजे ‘शाका लाका बूम बूम’. या शोने लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावले होते. अतिशय हटके कल्पनेवर आधारित असलेला हा शो तुफान गाजला. अतिशय रहस्यमयी अशा पेन्सिलने काढलेले चित्र सत्यात येते आणि यातून रोज वेगवेगळ्या घटना घडतात. संजू आणि त्याची जादूची पेन्सिल हा त्या काळातल्या सर्वच मुलांच्या चर्चेचा विषय असायचा. आजही या शोच्या आठवणी सर्वांच्या लक्षात असतील. या शोसोबतच शोमधील सर्वच कलाकार अर्थात बालकलाकार तुफान गाजले. आज या लेखातून त्या बालकालाकरांबद्दल जाणून घेऊया.

किंशुक वैद्य:
किंशुकने १९९९ साली आलेल्या मराठी सिनेमा ‘धांगड धिंगा’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. पुढे त्याने ‘राजू चाचा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्याला ‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेनंतर त्याने अभिनयातून ब्रेक घेत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. आता किंशुक अनेक मालिकांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करताना दिसतो.

हंसिका मोटवानी :
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या हंसिकाने ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेत करुणा ही भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर हंसिकाने ‘देस में निकला होगा चांद’ मालिकेत एक युवा अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. २००३ साली ती ऋतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ चित्रपटात दिसली. १५ व्या वर्षी हंसिकाने ‘देसमुदुरु’ या तामिळ सिनेमातून दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. पुढे ती हिमेश रेशमियासोबत ‘आप का सुरूर’ सिनेमात दिसली. सध्या हंसिका डेस्कहीनतय चित्रपटसृष्टीमध्ये गाजत आहे.

मधुर मित्तल :
हा शोमध्ये ‘टिटो’ ची भूमिका साकारणाऱ्या मधुर मित्तलने १९९७ साली ‘बुगी वूगी’ जिंकल्यानंतर ‘कसोटी जिंदगी की’ शोमध्ये दिसला. पुढे त्याने या शोमध्ये काम केले. शाका लाका बुम बुम मालिकेनंतर ‘पृथ्वीराज चौहान’ (2006), ‘जलवा’ (2007) जैसे कई शो में काम किया। इसके अलावा, वह ‘कहीं प्यार ना हो जाए’ (2000), ‘वन टू का फोर’ (2001) और ‘सलाम इंडिया’ (2007) जैसी फिल्मों में भी दिखाई दिए। हालांकि, स्लमडॉग मिलियनेयर (2008) आदी चित्रपटांमध्ये दिसला.

आदित्य कपाडिया :
आदित्यने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘इधर उधर’ मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. पुढे त्याने शाका लाका बूम बूम मालिकेत झुमरू ही भूमिका केली. या नंतर तो ‘जस्ट मोहब्बत’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘सोन परी’, ‘एक दूसरे से करते हैं प्यार हम’, ‘कंबाला इन्वेस्टिगेशन एजेंसी’, ‘अदालत’, ‘बड़े अच्छे लगते हैं’ आणि ‘बस एक मौका’ या गुजराती सिनेमात काम केले.

रिमा वोहरा :
‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेत रिमाने संजनाची भूमिका साकारली होती. रिमाला या मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये बघण्यात आले. त्यानंतर ती ‘श… कोई है’, ‘साथ साथ बनेगा एक आशियान’, ‘ना आना इस देस लाडो’, ‘दो दिल एक जान’, ‘भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप’ आदी शो चा भाग होती. यानंतर ती ‘यम किसी से काम नहीं’, ‘मरियम खान – रिपोर्टिंग लाइव’, ‘विष या अमृत: सितारा’, ‘नज़र 2’, ‘एक दूजे के वास्ते 2’, ‘कसौटी ज़िंदगी की’ आणि ‘शौर्य और अनोखी की कहानी’ आदी मालिकांमध्ये काम केले. याशिवाय ती ‘शौर्य’, ‘मुरली मीट्स मीरा’, ‘मंजुनाथ बीए एलएलबी’ आदी कन्नड चित्रपटांमध्ये काम केले.

अदनान जेपी :
शाका लाका बूम बूम या मालिकेत अदनानने जगू ही भूमिका साकारली. २००३ साली त्याने ‘शरत शो’ मध्ये काम केले त्यानंतर तो दुबईला गेला.

हेही वाचा :

हे देखील वाचा