हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमीच आपली प्रेम प्रकरणे लपवताना किंवा त्याबद्दल माध्यमांसमोर बोलणे टाळताना दिसत असतात. मात्र काही कलाकार असेही असतात, जे आपल्या प्रेम प्रकरणांची जाहीरपणे कबुली देताना दिसतात. यामध्ये अभिनेत्री कश्मिरा शाहचा (Kashmera Shah) सुद्धा समावेश होतो. आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असणार्या कश्मिराने तिच्या पहिल्या प्रेम प्रकरणाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
अभिनेत्री कश्मिरा शाह आपल्या बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे ती नेहमीच सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे असंख्य चाहते सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कश्मिराने आपल्या दमदार अभिनयाने चित्रपट जगतासह छोट्या पडद्यावरसुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिने शाहरुख खान (Shahrukh Khan) सोबत ‘येस बॉस’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील कश्मिराच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.
अभिनेत्री कश्मिरा जितक्या तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते तितकीच ती बिनधास्त बोलण्याने सुद्धा चर्चेत असते. आपल्या प्रेम प्रकरणाबद्दलही तिने असाच खुलासा केला होता. एका मुलाखतीत बोलताना कश्मिराने तिच्या आणि कॉमेडीयन कृष्णाच्या (Krushna Abhishek) प्रेम प्रकरणाचा खुलासा केला होता. यावेळी दोघे जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी एक रात्र सोबत घालवली होती. दोघांना त्या वेळी जागा मिळाली नाही, म्हणून चक्क वॅनिटी व्हॅनमध्येच शारीरिक संबंध ठेवल्याचा चकित करणारा खुलासा केला होता. तिच्या या वक्तव्याची तेव्हा जोरदार चर्चा रंगली होती.
अभिनेत्री कश्मिरा शाहने हॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शक ब्रेड लिसरमॅनसोबत लग्न केले होते. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर अवघ्या सहा वर्षात दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कश्मिराने पुन्हा एकदा चित्रपट क्षेत्रात लक्ष घालायला सुरुवात केली. यावेळी तिला चांगले यशही मिळाले. त्यानंतर कश्मिराने गोविंदाचा भाचा कृष्णासोबत लग्न केले. विवाहित आणि दोन मुलांची आई असूनही कश्मिरा खूपच फिट दिसते. यामुळेच तिच्या वयाचा अंदाज येत नाही.
हेही वाचा –










