बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट देणारे निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) आता त्यांचा नवा क्राईम ड्रामा चित्रपट ‘डेंजरस: खतरा’ घेऊन येत आहेत. राम गोपाल वर्मा हे क्राइम ड्रामा चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जात असले, तरी त्यांचा ‘डेंजरस: खतरा’ हा चित्रपट समलैंगिक संबंधांवर आधारित आहे. दोन लेस्बियन मुलींच्या नात्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या सर्वात वादग्रस्त चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाची मान्यता मिळाली असून, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए ग्रेड प्रमाणपत्र दिले आहे. आता राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे.
‘या’ दिवशी ‘डेंजरस-खतरा’ होणार आहे प्रदर्शित
राम गोपाल वर्मा हे भारताची पहिली लेस्बियन क्राइम स्टोरी म्हणून ‘खतरा’चे वर्णन करत आहेत. बर्याच दिवसांनंतर त्यांच्या चित्रपटाला आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉरकडून ए प्रमाणपत्र मिळाले आहे. हा चित्रपट लेस्बियनवर आधारित आहे. अखेर, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा सर्वात वादग्रस्त चित्रपट ‘खतरा: डेंजरस’ हा पहिल्या लेस्बियनवर बनला असून तो सेन्सॉर बोर्डाकडून पास झाल्यानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतात पहिल्यांदाच एका लेस्बियन प्रेमकथेवर बनलेला राम गोपाल वर्माचा सर्वात वादग्रस्त चित्रपट ‘खतरा: डेंजरस’ ८ एप्रिल २०२२ रोजी चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. राम गोपाल वर्मा यांनी या ट्वीटद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती दिली आहे.
माहिती देताना त्यांनी लिहिले की, “गुड न्यूज! ‘डेंजरस: खतरा सेन्सॉर’मध्ये पास झाला आहे.. माननीय सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द केल्यानंतर हा भारतातील पहिला लेस्बियन बॅकग्राउंड चित्रपट आहे.. प्रदर्शनाची तारीख लवकरच निश्चित केली जाईल…!” यासोबतच त्यांनी त्यांचे तेलुगू पोस्टरही शेअर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रदर्शनाच्या डेटची पुष्टी केली आहे.
GREAT NEWS ! DANGEROUS: KHATRA has passed through CENSOR ..It’s India’s 1st LESBIAN background film ever since the honourable Supreme Court repealed section 377 ..Will be confirming release date soon …Watch Trailer https://t.co/jsnyRRUlIl pic.twitter.com/kODCqkD4UD
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) February 10, 2022
चित्रपटात आहेत बोल्ड सीन्स
‘डेंजरस: खतरा’ चित्रपटाची कथा दोन महिलांमधील प्रेम आणि त्यांच्या समलैंगिक संबंधांवर आधारित आहे. सत्ताधारी समाजात असंतुष्ट असलेले पुरुष एकमेकांकडे आकर्षित होतात. हा क्राईम थ्रिलर ड्रामा चित्रपट असेल. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री अप्सरा राणी आणि नैना गांगुली मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात खूप बोल्ड सीन्सही शूट करण्यात आले आहेत.
चित्रपटाची कथा लेस्बियनवर आहे आधारित
आता राम गोपाल वर्माचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कितपत पसंत केला जातो, हे येणारा काळच सांगेल. पण अशा चित्रपटांना पसंती देणारा ठराविकच वर्ग आहे. पूर्वी राम गोपाल वर्मा खूप चांगल्या आशयावर चित्रपट बनवत असत. पण आता त्यांनी आपला ट्रॅक पूर्णपणे बदलला आहे.
हेही वाचा –
- ‘गंगूबाई काठीयावाडी’ चित्रपटातील कलाकारांनी घेतले तब्बल ‘एवढे’ मानधन, एकदा नजर टाका
- भुबन बड्याकरने त्याच्या ‘कच्चा बदाम’ गाण्यावर सूट-बुट घालून केला डान्स, पाहताच राहिले नेटकरी
- वडिलांच्या तेराव्याला रवीना टंडनने शेअर केले पंतप्रधान मोदी यांचे पत्र, या गोष्टींचा केला उल्लेख