Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

Apne 2 | मुलगा करणच्या दमदार पुनरागमनासाठी प्रचंड मेहनत घेतोय सनी देओल, काका बॉबी देओलही ‘या’ बाबतीत करतोय मदत

धर्मेंद्र (Dharmendra), सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांच्या ‘अपने २’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येत आहे. ‘अपने’मध्ये दोन पिढ्या एकत्र दिसल्या होत्या. पण आता ‘अपने २’मध्ये तिसरी पिढी म्हणजेच सनी देओलचा मुलगा करण देओल देखील दिसणार आहे. करणने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. करण अजूनही चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, आता बातमी आली आहे की, सनीही त्याचा मुलगा करणसाठी खूप मेहनत घेत आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, सनी देओल करणच्या पुनरागमनासाठी खूप मेहनत घेत आहे. यासाठी सनीने त्याच्या ‘अपने २’मध्ये करणला दमदार व्यक्तिरेखा दिली आहे. (sunny deol is preparing hard karan deol for upcoming movie apne 2)

वृत्तानुसार, सनी देओलने त्याच्या ‘गदर २’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर, तो ‘अपने २’चे शूटिंग सुरू करेल. सध्या सनी लखनऊमध्ये चित्रपटाच्या ४० दिवसांच्या शेड्यूलचे शूटिंग करत आहे. हे शूटिंग पूर्ण होताच तो ‘अपने २’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. पण दरम्यान, सनी करणला पूर्णपणे तयार करत आहे आणि त्याला त्याचे अभिनय कौशल्य आणखी चांगले करायचे आहे. त्याचवेळी काका बॉबी देओलही करणवर फिटनेससाठी काम करत आहेत.

धमाकेदार पुनरागमनाची आहे आशा
‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे करण खूप दु:खी झाल्याचे बोलले जात आहे. ‘पल पल दिल के पास’नंतर करणचा ‘वेले’ हा चित्रपटही गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण आता तो स्वतःवर जास्त काम करत असून यावेळी तो प्रेक्षकांची मने जिंकून दाखवणार आहे. तर आता करण काय अप्रतिम कामगिरी करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

करणला आजच्या स्टार किड्सप्रमाणे प्रसिद्धीझोतात राहणे आवडत नाही. ‘पल पल दिल के पास’ या पहिल्या चित्रपटापूर्वी किंवा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही तो फारसा प्रसिद्धीच्या झोतात राहिला नाही. सोशल मीडियावरही करण फारसा सक्रिय नसतो. त्याला आपले आयुष्य खासगी ठेवायला आवडते.

हेही वाचा –

हे देखील वाचा