Friday, March 14, 2025
Home अन्य ‘झुंड’ चित्रपटातील कलाकारांनी लावली फूटबॉलच्या मैदानावर हजेरी, आकाश ठोसरच्या लूकने वेधले लक्ष

‘झुंड’ चित्रपटातील कलाकारांनी लावली फूटबॉलच्या मैदानावर हजेरी, आकाश ठोसरच्या लूकने वेधले लक्ष

अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट येत्या ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत मराठी चित्रपट ‘सैराट’मधील अभिनेता आकाश ठोसर देखील आहे. तसेच नागराज मंजुळे यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालू आहे. अशातच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मुंबईतील एका मैदानावर फुटबॉलचे आयोजन केले. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत.

नागराज मंजुळे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी मराठीमध्ये अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्यांचे सगळे चित्रपट सुपरहिट देखील झाले आहे. अशातच त्यांनी ‘झुंड’ चित्रपटातील सगळ्या कलाकारांसोबत फुटबॉल खेळले आणि खूप मस्ती केली. (jhund movie actors play football match on ground, photos get viral)

यावेळी आकाश ठोसर देखील तिथे होता. ‘सैराट’ चित्रपटानंतर आकाश ठोसरच्या लूकमध्ये खूप बदल झाला आहे. तो फिट दिसत होता. त्यामुळे सगळ्यांची नजर त्याच्यावर खिळली होती. आकाशने त्याचा हा लूक बदलण्यासाठी खूप मेहनत घेतलेली दिसत आहे.

या फोटोमध्ये आकाशचे केस वाढलेली दिसत आहे. तो स्पोर्ट लूकमध्ये दिसत आहे. तो फुटबॉलच्या मैदानात फुटबॉल खेळताना दिसत आहे. तसेच नागराज मंजुळे यावेळी ‘झुंड’ टीमसोबत पोझ देताना दिसत आहे. यावेळी चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग देखील या मैदानावर फुटबॉल बघण्यासाठी गेले होते. ‘झुंड’ हा एक फुटबॉलवर आधारित असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन फुटबॉल कोचचे पात्र निभावताना दिसणार आहे. जे गरीब मुलांची फुटबॉलची टीम बनवतात आणि त्यांना फुटबॉल शिकवतात.

या चित्रपटाच ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात अमिताभ बच्चन यांचा लूक आणि त्यांचे पात्र सगळ्यांना खूप आवडले आहे. अनेकजण त्यांच्या या पात्राला पसंती दर्शवत आहेत. हा चित्रपट स्लम सॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आणि घटनांवर आधारित आहे. ज्यांनी फुटबॉलच्या माध्यमातून नागपूरच्या गल्लीतील मुलांना एक नवीन आयुष्य आणि एक नवीन ओळख निर्माण करून दिली. त्यामुळे त्यांचा हा चित्रपट पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा