मागील दोन वर्षांपासून संपूर्ण देश कोरोनाच्या सावटाखाली जगत आहे. या दोन वर्षांमध्ये सर्वच लोकांचे सार्वजनिक आयुष्य जगणे विसरूनच गेले होते. मात्र कोरोनाने थोडी उसंत घेतली तशा अनेक सरकारने देखील सार्वजनिक क्षेत्रावरील निर्बंध शिथिल केले होते. मात्र आता सुदैवाने कोरोना कमी होत असल्याने सरकारने चित्रपटगृह आणि नाट्यगृहांवरील बंधनं पूर्णतः काढून टाकले आहे. महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यामध्ये सरकारने हे निर्बंध पूर्णतः काढून टाकले आहे. कोरोना संसर्गाचा प्रभाव ओसरल्याने राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नियमानुसार राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या १४ जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने हॉटेल्स, सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच या जिल्ह्यातील पर्यटन आणि धार्मिकस्थळेही पूर्ण क्षमतेने सुरू केले जाणार आहे. येत्या ४ मार्चपासून नव्याने करण्यात आलेले बदल लागू होतील. मात्र या १४ जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सध्याचीच कोरोनाचे निर्बंध सुरु राहणार आहे. सरकारच्या या १४ जिल्ह्यांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे नाट्य, सिनेमासह पर्यटन आणि हॉटेल व्यवसायालाही मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की, निर्बंध शिथील करण्यात जरी आले असले तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे या १४ जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार असून, सर्व उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे सरकारने सांगितले आहे. राज्य सरकारने या सर्व १४ जिल्ह्यांना अ श्रेणीत टाकले असून, या अ श्रेणीतील जिल्ह्यातील ९० टक्के लोकांनी पहिला डोस घेतला असून, ७० टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच या जिल्ह्यांतील कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट दहा टक्के असल्याने निर्बंधात सूट देण्यात येत असल्याचे नियमावलीत सांगितले आहे.
हेही वाचा :










