Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी सनी लिओनीचा देसी जुगाड, व्हिडिओ पाहून चाहतेही चक्रावले!

शहरांमध्ये किती प्रमाणात ट्रॅफिक असते, हे सर्वांनाच माहित आहे. या शहरांपैकी एक असलेले शहर म्हणजे मुंबई होय. एकदा का या ट्रॅफिकमध्ये अडकलात की, मग किमान दोन-तीन तास गेलेच म्हणून समजा. त्यावर सतत हॉर्नचा आवाज येणे, उष्णता, घाम आणि चिकटपणा. परिस्थिती आणखी बिघडणे साहजिक आहे. मुंबईच्या ट्रॅफिकमुळे बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत आपलं नाव नोंदवणारी अभिनेत्री सनी लिओनीही (Sunny Leone) त्रस्त आहे.

सनी लिओनीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सनीच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर कदाचित चांगली चालली नसेल, परंतु तिचा स्टाईलिश अंदाज आणि स्टाईल नेहमीच लोकांना तिच्याकडे आकर्षित करते. मात्र मुंबईच्या ट्रॅफिकवर राग येण्याऐवजी सनीने याला टाळण्याचा उत्तम मार्ग शोधला आहे. आता मुंबईच्या रस्त्यांवर कितीही वेळ ट्रॅफिक जॅम असुद्या, सनी त्याच्यातून चुटकीसरशी बाहेर पडू शकते. हा जुगाड स्वतः सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. जाणून घेऊया काय आहे हा जुगाड.

ट्रॅफिकच्या या समस्येला तोंड देण्यासाठी सनी लिओनीने केलेला जुगाड पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्हालाही नक्कीच हसायला भाग पाडेल. कारण सनी लिओनी ज्या जुगाडाने मुंबईच्या अवजड वाहतुकीला बाजी मारण्याचा प्रयत्न करत आहे, ते मोठे वाहन नाही. सनी लिओनी लहान मुलांनी चालवलेल्या किक स्कूटरने हे ट्रॅफिक ओलांडत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एका बाजूला गर्दीने भरलेला रस्ता आहे. रस्त्याच्या दुस-या बाजूला सनी लिओनी वेगवान किक स्कूटर चालवताना दिसत आहे. ही स्कूटर चालवतानाचा रोमांच तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

लहान मुलांची गाडी चालवताना चेहऱ्यावर लहान मुलासारखा उत्साह आहे. सनी लिओनी ही स्कूटर पूर्ण वेगाने वाहनांच्यामध्ये चालवत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत सनी लिओनीने कॅप्शनही दिले आहे की, ”ट्रॅफिकमध्ये अडकण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे.”

किक स्कूटर म्हणजे काय?
किक स्कूटर हे एक प्रकारचे लहान मुलांचे खेळणे आहे. ज्यावर एक पाय ठेवून दुसऱ्या पायाने जमिनीवर लाथ मारली जाते. या किकच्या दाबाने ही स्कूटर पुढे सरकते. वेग पकडल्यानंतर दोन्ही पायांनी स्वार होते. सनी लिओनी देखील याच अंदाजात ही किक स्कूटर चालवत आहे. तिच्या या स्टाईलला आतापर्यंत चार लाखांहून अधिक युजर्सने लाईक केले आहे.

सनी लिओनीने तिच्या ग्लॅमरस अदा आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने बॉलिवुडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे. सनी लिओनीने तिच्या करिअरची सुरुवात ‘जिस्म २’ या चित्रपटातून केली आहे. त्यानंतर तिने ‘जॅकपॉट’, ‘रागिणी एमएमएस २’, ‘एक पहेली लीला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सनी लिओनीचे आता इंस्टाग्रामवर जवळपास ५० मिलियन फॉलोवर्स आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा