हिंदी चित्रपट आणि मनोरंजन जगतात रोज अनेक प्रेमप्रकरणे जुळतात तितकीच संपुष्टात ही येतात. ब्रेकअप आणि पॅचअप होणे हे काही या क्षेत्रात नवीन नाही मात्र सध्या टिव्ही कलाकार वरुण सूद (Varun Sood) आणि दिव्या अग्रवालच्या (Divya Agrawal) ब्रेकअपची संपुर्ण मनोरंजन क्षेत्रात चर्चा सुरू आहे. इतकेच नव्हेतर त्यांच्या ब्रेकअपमुळे वरुण सूदला यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरूवात केली आहे. काय आहे हे संपुर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार म्हणून ओळखले जाणारे दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दोघांनीही याबाबत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. त्यांनी दिलेल्या या माहितीने सगळीकडे चर्चा रंगली होती. आता याच कारणामुळे सोशल मीडियावर अभिनेता वरुण सूदला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरूवात केली आहे. त्यांच्या मते वरुण आणि दिव्याच्या ब्रेकअपला वरुणच कारणीभूत आहे. त्याचबरोबर त्याची मैत्रिण मधुरिमा रॉयमुळे त्याने दिव्याशी ब्रेकअप केल्याचाही आरोप त्याच्यावर नेटकऱ्यांनी केला आहे. नेटकऱ्यांच्या या टिकेला वरुण आणि दिव्याने सडेतोड उत्तर दिले आहे.
वरुणने आपल्या ट्विटर अकांउटवरुन याबाबत संताप व्यक्त करताना, “नमस्कार मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की, लोकांना श्वास घेऊ द्या. दोन व्यक्ती जर एखाद्या गोष्टीबद्दल काही बोलत नसतील याचा अर्थ ते काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. असा एकमेकांना दोष देणे योग्य नाही,” असे म्हटले आहे. याआधी दिव्यानेही याबाबत टविट करत आपले मत व्यक्त केले होते. यामध्ये तिने “सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होते जेव्हा आपण लोकांच्या म्हणण्यानुसार आपण वागणे सोडून देतो. ते दबाव टाकतात, धमक्या देतात, रडतात, कुणालाही माहित नसते की, घरात काय काय घडते. कुणालाही जाणून घेण्याची आवश्यकता नाही. हा सगळा सामाजिक दबाव मला पुढे जाण्यास अडथळा निर्माण करत आहेत” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या त्यांच्या या ट्विटची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा –
- ऋता दुर्गुळे ठरली मिलियनमध्ये फॅन क्लब असणारी पहिली मराठी अभिनेत्री, वाचा संपूर्ण माहिती
- Mika Di Vohti | मिका सिंगच्या स्वयंवरची झालीय तयारी, ‘या’ दिवसापर्यंत करू शकता रेजिस्ट्रेशन
- आदित्य नारायणने पहिल्यांदा दाखवली मुलीची झलक, वडिलांच्या खांद्यावर झोपलेली दिसली त्विषा