मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक नागराज मंजुळे हे नेहमीच एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. समजतील एखादा दुर्लक्षित घटक ते त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतात. असाच एक धाटणीचा विषय त्यांनी ‘झुंड’ या चित्रपटातून दाखवला आहे. त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे कलाकार देखील चित्रपटात आहे. कहाणी काहीशी वेगळी असल्याने प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची भरघोस कमाई होत आहे. अशातच नागराज मंजुळे आणखी एक चित्रपट बनवणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित ते एक चित्रपट करणार आहेत. परंतु कोरोनामुळे चित्रपटाची निर्मिती थांबवण्यात आली होती. याची माहिती नागराज मंजुळे यांनीच दिली आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुख हे दोघे मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तस्केह नागराज मंजुळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. दोन वर्षापूर्वी या चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित झला आहे. या टिझर मध्ये हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे असे सांगण्यात आले आहे. परंतु कोरोनामुळे चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली. (Nagraj manjule directed shivaji maharaj movie teaser released 2 years ago)
याबाबत नागराज मंजुळे यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले की, “कोरोनामुळे आमचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. त्यात आम्हाला दोन वर्षे गमवावी लागली. ज्यामुळे आम्हाला नैसर्गिकरित्या या चित्रपटाचे काम करता आले नाही. पण हा चित्रपट रखडला असे आपण बोलू शकत नाही. हा एक अत्यंत उत्कृष्ट प्रकल्प आहे. या चित्रपटाबद्दल तुमच्याइतकाच मी देखील खूप उत्सुक आहे आणि याबाबत सर्व काही व्यवस्थित झाले की तुम्हाला याची माहिती देईन.”
https://www.instagram.com/p/CZg9aMTsXkR/?utm_source=ig_web_copy_link
ते पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाची निर्मिती करणे हे आव्हानात्मक आहे. हा चित्रपट ऐतिहासिक आहे. पण शेवटी आम्ही एका चित्रपटाची निर्मिती करत आहोत आणि चित्रपटाच्या निर्मितीचे नियम बदलत नाही. फक्त विषय बदलतात आणि अर्थातच चित्रपटाच्या स्वरुपात एक आव्हान समोर येतं. मी जेव्हा लहान होतो तेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट किती छान होईल, याचा विचार करायचो. मी त्यांच्यावर निर्मित झालेले दोन चित्रपट पाहिले आणि आता मला ते स्वत: बनवायचे आहेत. त्यामुळे माझ्यासाठी हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.”
अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ‘शिवत्रयी’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. तर या भव्य अशा चित्रपटाला संगीत अजय-अतुल देणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :
- ‘बच्चन पांडे’मधील ‘हिर रांझना’ गाण्याचा टिझर रिलीज, अक्षय अन् जॅकलिनच्या केमेस्ट्रीने जिंकली लाखो मने
- Happy birthday : म्हणून श्रेया घोषालने कधीही कोणत्या गायकाला केले नाही डेट, स्वतः केला खुलासा
- ऐश्वर्या रायने ‘या’ चित्रपटात केले होते सुनील शेट्टीसोबत काम, परंतु असे काय झाले की, चित्रपटाची शूटिंग केली बंद