दक्षिणेतील लोकप्रिय आणि दिग्गज गीतकार कांदिकोंडा (Kandikonda) यांचे शनिवारी (१३ मार्च) संध्याकाळी निधन झाले. कांदिकोंडाच्या मृत्यूमुळे संपूर्ण उद्योगजगत शोकाकुल आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृत्तानुसार, कांदिकोंडाचा मृत्यू आरोग्याच्या अनेक गुंतागुंतांमुळे झाला. माध्यमातील वृत्तानुसार, कांदिकोंडा हे गेल्या २ वर्षांपासून घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. यासोबतच ते आर्थिक संकटातूनही जात होते. एवढेच नाही, तर त्यांनी आपल्या मित्रांकडून आर्थिक मदतही मागितली होती. कांदिकोंडाच्या मृत्यूची माहिती तेलुगू सिने रायटर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ परचुरी गोपालकृष्ण यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
ही वाईट बातमी ऐकून चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. गायिका स्मिताने त्यांच्याबद्दल ट्विट केले की, “मला ट्विटर आणि उद्योग परिवाराला सांगायचे आहे की, गीतकार कांदिकोंडा आता राहिले नाहीत. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो. ओम शांती.” (telugu lyricist kandikonda passes away at the age of 49)
With a heavy heart, i would like to inform the twitter and industry family that Lyricist Kandikonda garu is no more. Wishing for God to give his family strength to deal with the loss. OmShanti
— Smita (@smitapop) March 12, 2022
दुसरीकडे, कांदिकोंडा हे नाव ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि प्रत्येकजण गीतकाराला दुःखी मनाने श्रद्धांजली वाहतो आहे.
We mourn the loss of renowned lyricist #Kandikonda Garu is no longer with us.
May his soul Rest In Peace #RIPKandikonda #RestinPeaceKandiKonda #MangoMusic pic.twitter.com/mTb1zoL8vr— Mango Music (@MangoMusicLabel) March 12, 2022
Gunde godarila …. ????
From #Maska (2009)
Composed by #Chakri garu ????
Penned by #Kandikonda garu ????#telugutunes pic.twitter.com/8wYbHZfjfy— TeluguTunes (@telugu_tunes) June 18, 2021
Ayana rasina paatala roopam lo epatiki manathone untaru???????????????? Om Shanti???????????????? #Kandikonda pic.twitter.com/TNSwP6ErW1
— Sai Srujan (@sai_pelluri) March 12, 2022
कांदिकोंडाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी पुरी जगन्नाध यांच्या ‘इटलू श्रावणी सुब्रमण्यम’ या चित्रपटाद्वारे गीतकार म्हणून पदार्पण केले. यानंतर त्यांनी १०० हून अधिक तेलुगू आणि तमिळ चित्रपटांसाठी गीते लिहिली. त्यांनी ज्येष्ठ गायक ए आर रहमान आणि युवान शंकर राजा, डी अम्मान, मणि शर्मा यांसारख्या लोकप्रिय संगीतकारांसाठीही गाणी लिहिली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :










