बॉलिवूडमध्ये काम करणारे सर्वच कलाकार त्यांच्या फिटनेसबाबत खूपच सजग आणि जागरूक असतात. या कलाकारांच्या फिटनेसची चर्चा नेहमीच मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये होताना दिसते. अनेक सीनियर कलाकार देखील त्यांच्या फिटनेसबद्दल खूपच जागरूक पाहायला मिळतात. अगदी हेमा मालिनी, माधुरी दीक्षितपासून ते सुनील शेट्टी, धर्मेंद्रपर्यंत अनेक कलाकार त्यांच्या अभिनयासोबतच फिटनेससाठी देखील ओळखले जातात. यासर्वांमधे अनिल कपूर यांना विसरून अजिबात चालणार नाही. इंडस्ट्रीमध्ये तर अनिल कपूर त्यांच्या फिटनेसबद्दल सर्वात जास्त गाजताना दिसतात. अनिल कपूर यांचे अनेक फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
आपल्या आकर्षक लुक्समुळे, दमदार अभिनयामुळे आणि कमालीच्या फिटनेसमुळे अनिल कपूर हे ओळखले जातात. वयाच्या ६५ व्या वर्षी देखील त्यांनी त्यांचा फिटनेस जपला आहे. त्यांना पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे निव्वळ अवघड आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारे अनिल कपूर नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत फॅन्ससोबत संपर्कात असतात. नुकताच अनिल कपूर यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला असून, हा फोटो पाहून कलाकार आणि फॅन्स तर त्यांचे अधिकच जास्त चाहते झाले आहेत.
अनिल कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या मित्रांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ते त्यांच्या मित्रांसोबत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये अनिल कपूर पूलमध्ये डाइव्ह मारताना दिसत आहे. या फोटोमध्ये अनिल काळा गॉगल आणि टोपी घातलेल्या कूल लूकमध्ये दिसत आहे. त्यांच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी आणि फॅन्सने कमेंट्स केल्या आहेत. मात्र या सर्वांमध्ये अनिल कपूर यांच्या जावयाने केलेली कमेंट सर्वात जास्त लक्ष वेधून घेत आहे.
अनिल कपूर यांच्या दुसऱ्या मुलीचा रिया कपूरचा नवरा असलेल्या करण बुलानीने कमेंट्समध्ये लिहिले की, “हॉट टबमध्ये हे काय होत आहे…चला तुम्ही यातच राहा.” तर प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर असलेल्या फराह खानने लिहिले, “पापाजी…यानंतर तिने एक हसण्याची ईमोजी पोस्ट केली आहे. याशिवाय अनिल कपूरच्या या पोस्टवर अनेक हार्ट ईमोजी, फायर ईमोजी पोस्ट केल्या आहेत.
अनिल कपूर यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ते लवकरच ‘जुग जुग जियो’ चित्रपटात वरुण धवन आणि कियारा अडवाणी, नितु सिंगसोबत महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय ते ‘फायटर’ सिनेमात ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :