आता सर्वत्र कोणत्या चित्रपटाची चर्चा असेल, तर तो चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाइल्स’ होय. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. हा चित्रपट अगदी प्रदर्शनापूर्वी पासून चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून याचा सर्वत्र बोलबाला आहे. कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवा इतिहास रचत आहे. दुसऱ्या आठवड्यातही विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. चित्रपटाने आपल्या गेल्या ८ दिवसांच्या कमाईचा विक्रम मोडला. शनिवारी (१९ मार्च) सर्वाधिक कमाई केली आणि बड्या चित्रपट निर्मात्यांना घाम फुटला.
‘द कश्मीर फाईल्स’ला (The Kashmir Files) दुसऱ्या आठवड्यात देखील प्रेक्षकांचे इतकं प्रेम मिळत आहे की, दुसऱ्या आठवड्यातही त्याची वेगाने कमाई सुरू आहे. त्यावरून हा चित्रपट एक नवा आयाम प्रस्थापित करणार आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटगृहांमध्ये सध्या ‘बच्चन पांडे’ला टक्कर देत आहे.
तरण आदर्शच्या लेटेस्ट ट्वीटनुसार, ‘द काश्मीर फाइल्स’ने गेल्या ८ दिवसांत ९ व्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. ‘बाहुबली २’ दुसऱ्या आठवड्यात झाला तसाच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या चित्रपटाने ९ व्या दिवशी म्हणजेच शनिवारी (१९ मार्च) २४.८० कोटींची कमाई केली आहे. रविवारी (२० मार्च) म्हणजेच १० व्या दिवशी हा चित्रपट २८-३० कोटींची कमाई करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई १४१.२५ कोटींवर गेली आहे.
४७ वर्षांनंतर ‘द काश्मीर फाइल्स’ बनवत आहे इतिहास
‘जय संतोषी मां’ हा १९७५ साली प्रदर्शित झालेला तो बॉलिवूड चित्रपट आहे, ज्याने त्यावेळी इतिहास रचला होता. तो इतिहास पुन्हा एकदा ‘द काश्मीर फाइल्स’ रचताना दिसत आहे. तरण आदर्शने केलेल्या ट्वीटनुसार, ४७ वर्षांनंतर ही दुसरी वेळ आहे की, कमी बजेटचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एवढी मोठी कमाई करून नवीन बेंचमार्क स्थापित करत आहे. ४७ वर्षे जुन्या ‘जय संतोषी माँ’ चित्रपटाने ‘शोले’ चित्रपटाला तगडी टक्कर देत इतिहास रचला.
‘द काश्मीर फाइल्स’ही ‘बच्चन पांडे’च्या नाही मागे
‘बच्चन पांडे’मध्ये अक्षय कुमार आणि क्रिती सेननसारखे मोठे स्टार्स असून देखील तो ‘द कश्मीर फाइल्स’मधील प्रेक्षकांचे आकर्षण तोडू शकलेला नाही. ‘बच्चन पांडे’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘द काश्मीर फाइल्स’च्या कमाईचा वेग कमी होईल, असे मानले जात होते. मात्र यावेळी अक्षयची जादू चालू शकली नाही.
या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), दर्शन कुमार (Darshan Kumar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ९० च्या दशकात काश्मिरी पंडित, हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कथा आहे. या चित्रपटात काश्मिरी नरसंहाराचे वेदनादायक आणि भावनिक चित्र रेखाटण्यात आले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा