रणदीप हुड्डा (Randeep Hooda) जरी त्याच्या वैयक्तिक आयुष्याला लाईमलाईटपासून दूर ठेवत असेल, तरीही तो कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहतो. आता त्याच्या नव्या अफेअरच्या बातम्या मीडियात फिरत आहेत. असे सांगितले जात आहे की, रणदीपला त्याचे प्रेम सापडले आहे आणि तो मॉडेल लिन लैशरामला (Lin Laishram) डेट करत आहे. जिने ‘ओम शांती ओम’ आणि ‘मेरी कॉम’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मात्र, रणदीप आणि लिन लिव्ह-इनमध्ये राहतात की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण दोघांनीही याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. पण रणदीपच्या आयुष्यात लिनने वेगळे आणि खास स्थान निर्माण केल्याचेही बोलले जात आहे. रणदीप आणि लिन जवळपास ८ महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. काही काळापूर्वी लिनने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये रणदीपही तिच्यासोबत दिसत होता. या लिंक-अपवर काही नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (is randeep hooda dating om shanti om and mary kom actress lin laishram?)
लिनच्या अगोदर नीतूसोबत रिलेशनशिपमध्ये होता रणदीप
याआधी रणदीपचे नाते नीतू चंद्रासोबत (Neetu Chandra) होते अशी माहिती आहे. रणदीप नीतूसोबत एकूण ३ वर्षे (२०१०- २०१३) रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, नीतूने रणदीपसोबतच्या नात्याबद्दल कधीच बोलले नाही. त्यांच्या ब्रेकअपच्या ६ वर्षांनंतर नीतूने त्यांच्या विभक्त होण्याचे कारण सांगितले होते. त्याचवेळी रणदीपने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, “कधीकधी एखाद्याला मोठ्या ध्येयासाठी त्याग करावा लागतो. सध्या माझ्या आयुष्यात फक्त माझा मेकअप, सेट आणि पात्रे आहेत.”
रणदीप हुड्डा आणि लिन लैशरामच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर रणदीप हुड्डाने ‘हायवे’, ‘जन्नत २’, ‘किक’, ‘सरबजीत’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. त्याचवेळी लिन लैशराम ही मूळची मणिपूरची असून शोबिझमधील एक यशस्वी मॉडेल आहे. तिने ‘रंगून’, ‘ओम शांती ओम’ आणि ‘मेरी कॉम’ सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘ओम शांती ओम’ चित्रपटात तिने ओम कपूरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-