टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा, लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) ओळखला जातो. या शोमध्ये प्रत्येक आठवड्यात विविध सेलेब्रिटी येऊन त्यांच्या चित्रपटांचे, मालिकांचे, शोचे प्रमोशन करतात. दर आठवड्याला या शोमध्ये कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या पाहुण्यांसोबत धमाल, मजा मस्ती करताना दिसतो. या आठवड्यात कपिलच्या शोमध्ये मनोरंजनविश्वातील अतिशय नावाजलेले गायक येणार आहे. नुकताच या भागाचा एक प्रोमो समोर आला असून, यात गायक अनुप जलोटा ( Anup Jalota), सुदेश भोसले (Sudesh Bhosale) आणि शैलेंद्र सिंग (Shailendra Singh) यांच्यासोबत कपिल मजामस्ती करताना दिसत आहे. या भागामध्ये या सर्व गायकांनी त्यांच्या आयुष्यातील विविध मजेशीर किस्से आणि आठवणी शेअर केल्या.
प्रोमोमध्ये दिसते की, कपिल शर्मा शोमध्ये अनुप जलोटा, त्यानंतर सुदेश भोसले आणि शैलेंद्र सिंग या क्रमाने हे तिघे एन्ट्री घेतात. तिघांच्याही एन्ट्रीवर कपिलने मजेशीर पंच देखील मारले. सुदेश भोसले यांना पाहून कपिल म्हणाला, “बच्चन साहेब सुदेश भोसले यांना पाहूनच वक्तशीर झाले आहेत. त्यांना सतत भीती वाटायची की, जर मला उशीर झाला तर सुदेश भोसले माझी डबिंग करून निघून जातील.” प्रोमोमध्ये पुढे दिसते की, कपिल शर्मा म्हणतो “सुदेश सर तुमचे जुम्मा चुम्मा गाणे तुफान हिट झाले. त्यानंतर तुम्ही कुठे कुठे लाईव्ह शो केले?” त्यावर सुदेश भोसले म्हणतात. “मी माझ्या प्रत्येक लाईव्ह शोमध्ये सांगत असतो की, हे गाणे गायले तर मी पण घेतले त्यांनी.” हे ऐकून तिथे असलेले सर्वच लोकं जोरजोरात हसायला लागतात.
कपिल शर्मा शैलेंद्र सिंग यांच्यासोबत मजामस्ती करताना म्हणतो की, “तुमचे व्यक्तिमत्व पाहून असे वाटते की, तुम्ही कोणत्या बँकेचे सीईओ आहात.” त्यावर ते म्हणतात, “मी त्या बँकेचा सीईओ आहे ज्यात पैसे नाही.”. पुढे कपिल अनुप जलोटा यांना म्हणतो की, “तुम्ही दिवसेंदिवस अधिकच हँडसम होत आहात.” शोमध्ये किकू शारदा येऊन मजेशीर पंच मारताना दिसतो. त्याला अनुप जलोटा, शैलेंद्र सिंग आणि सुदेश भोसले या तिघांना घेऊन जिंदगी मिलेगी ना दोबारा सिनेमाचा दुसरा भाग काढायचा असल्याचे सांगतो. ज्यात तो अनुप यांना ऋतिक रोशन, शैलेंद्र यांना अभय देओल आणि सुदेश यांना फरहान अख्तर अशा भूमिका देणार असल्याचे सांगतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-