नुकतेच रॅपर धर्मेश परमार याचे मुंबईमध्ये आकस्मिक निधन झाले. धर्मेश त्याच्या एमसी तोडफोड नावाने तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या धर्मेशच्या अशा अचानक निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. धर्मेशला सर्वात मोठी ओळख मिळाली जेव्हा त्याने रणवीर सिंहच्या ‘गली बॉय’ सिनेमाला संगीत दिले होते. आलिया भट आणि रणवीर सिंह यांचा ‘गली बॉय’ सिनेमामुळे लोकप्रिय झालेला रॅपर धर्मेश परमार उर्फ एमसी तोड फोड याचे अवघे २४ व्या वर्षी निधन झाल्यामुळे सर्वच लोकं हळहळ व्यक्त करत त्याच्या अचानक झालेल्या या निधनामुळे अनेक फॅन्स याचे कारण विचारत आहे.
एमसी तोडफोड अर्थात धर्मेश परमारचे २० मार्च रोजी निधन झाले. त्याच्या निधनाची अनेकांनी वेगवेगळी कारणे दिली. मात्र त्याचे निधनाची खरे कारण आता समोर आले आहे. धर्मेश एवढ्या कमी वयातही अनेक आजारांशी लढत होता. यातच त्याला २० मार्चला स्ट्रोक आला आणि यात त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाचे कारण त्याच्याच जवळच्या व्यक्तीने सांगितल्याचे बोलले जात आहे. धर्मेशन खूपच कमी वयात मोठी ओळख निर्माण केली होती. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमधून देखील अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

‘गली बॉय’ सिनेमामुळे धर्मेशला ओळख मिळाली. याच सिनेमाच्या संपूर्ण टीमने झोया अख्तर, आलिया भट्ट, सिद्धांत चतुर्वेदी आदी कलाकारांनी त्याच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेरा करत धर्मेशला श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबईतील स्ट्रीट रॅपर कम्युनिटीमध्ये धर्मेश एमसी तोडफोड या नावानं प्रसिद्ध होता. त्याच्या गुजराती रॅपमुळे तो नावारुपास आला होता. धर्मेशच्या स्वदेशी बँडनं सोशल मीडियावर त्याच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला होता. एमसी तोडफोडचा बँड स्वदेसीने त्याच्या निधनाची माहिती देत त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी धर्मेशच्या शेवटच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ पोस्ट केला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-










