Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘जो उर्वशी से जले, जरा साईड से चले!’ उर्वशी रौतेलाच्या बोल्ड व्हिडिओवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

‘जो उर्वशी से जले, जरा साईड से चले!’ उर्वशी रौतेलाच्या बोल्ड व्हिडिओवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी च्या फोटोंची व्हिडिओची सगळीकडे चर्चा होत असते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने चित्रपट जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.  आपल्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने ती नेहमीच चाहत्यांना मोहित करते.सध्या सोशल मीडियावर उर्वशीचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे. काय आहे तो व्हिडिओ चला जाणून घेऊ.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती थाई हाय स्लिट गाऊन परिधान करून कॅमेऱ्याकडे पाहताना हातात गुलाब घेऊन आकर्षक स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेलाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे जो थाई हाय स्लिट गाऊन आहे. याशिवाय तिने केस बांधले आहेत, गळ्यात हार घातला आहे. तसेच तिच्या हातात गुलाब आहे. तिने कानात झुमके घातले असून हलकासा मेकअप केला आहे. ती मनमोहक स्टाईलमध्ये पोज देत आहे. हा भन्नाट व्हिडिओ उर्वशी रौतेलाने 1 तासापूर्वी पोस्ट केला असून त्याला 33000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यावर अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. यावर अनेक चाहते वेगवेगळ्या प्रकारे मजेशीर कमेंट करत आहेत.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिलं आहे की, ‘जो उर्वशीसोबत जळतो, तो बाजूने  चालतो.” त्याचबरोबर अनेकांनी ‘युनिव्हर्सल क्रश’ असे लिहिले आहे, तर बरेच लोक व्हेरी क्यूट, किन्ना सोना, तू सोना, व्हेरी व्हेरी ब्युटीफुल, ब्युटीफुल, लवली, अमेझिंग, नाइस आणि हॉट अशा कमेंट करत आहेत. दरम्यान उर्वशी रौतेला चित्रपटांपेक्षा मॉडेलिंगमध्ये जास्त सक्रिय आहे. उर्वशी तिच्या हॉट आणि ग्लॅमरस इमेजसाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, ज्याबद्दल चाहते खूप उत्सुक असतात.सध्या मात्र तिच्या या पोस्टची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा