सध्या छोट्या पडद्यावरील स्मार्ट जोडी कार्यक्रम चर्चेत आहे. स्टार प्लसवर प्रसारित होणाऱ्या ‘स्मार्ट जोडी’ या कार्यक्रमात एकापेक्षा एक विवाहित जोड्या पाहायला मिळत आहेत. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)-विकी जैनपासून (Viki jain) ते अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) आणि त्याची पत्नी नेहा स्वामीपर्यंत (Neha Swami) अनेक मोठे स्टार्स कार्यक्रमाचा भाग आहेत. या कार्यक्रमात हे रियल-लाइफ जोडपे स्टेजवर आपले नृत्य कौशल्य दाखवत आहेतच, सोबतच ते स्टेजवर त्यांच्या खासगी संबंधित अनेक किस्से शेअर करताना दिसत आहेत. अलीकडेच राहुल महाजन(Rahul Mahajan) जो त्याच्या विनोदी शैलीमुळे ओळखला जातो, या कार्यक्रमात खूप भावूक झाला आणि त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे चर्चेत आहे.
याबाबत संपूर्ण बातमी अशी की, स्टार प्लसने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राहुल महाजन आणि त्याची पत्नी नताल्या इलिनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल महाजन आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. राहुल महाजनने स्टेजवर सांगितले की, जेव्हा त्याने तिसऱ्यांदा लग्न केले तेव्हा लोकांनी खूप ट्रोल केले. व्यासपीठावर आपल्या भावना व्यक्त करताना राहुल खूपच भावूक झाला. यावेळी त्याने आपल्या वडिलांची आठवण काढली आणि सांगितले की, त्याच्या वडिलांची नेहमी इच्छा होती की त्याने नेहमी आनंदी राहावे, परंतु जेव्हा त्याने तिसरे लग्न केले तेव्हा लोकांनी सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली.
राहुल महाजन या व्हिडिओ मध्ये म्हणतो की “लग्नात पती-पत्नीशिवाय वडिलांची भूमिका होती. मी 24-25 वर्षांचा होतो तेव्हा माझे वडील मला नेहमी म्हणायचे, तुला जे पाहिजे ते मी देतो, पण एकच काम कर लग्न कर आणि आनंदी राहा. कारण आयुष्य खूप वेगळं आहे, ही एक दिवसाची गोष्ट नाही. जेव्हा लोक कुठेतरी तिसरे लग्न म्हणतात, तेव्हा मला वाटते की प्रत्येक वेळी नताल्याचा अपमान आहे. तिला तिसरी पत्नी म्हटले जाते. हे नाते जपण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे आणि माझा हेतू नेहमीच खरा होता. आमच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. माझ्या वडिलांना ही माझी श्रद्धांजली आहे.” यासोबतच राहुल महाजनने पत्नीला मोठ्या प्रेमाने किस केले. त्याच्या या भावूक भावना ऐकून सगळेच स्तब्ध झालेले पाहायला मिळाले.
दरम्यान राहुल महाजनचे पहिले लग्न बालपणीची मैत्रीण श्वेता सिंगसोबत झाले होते, पण लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. दोघेही गेल्या १३ वर्षांपासून ओळखत होते. राहुल महाजन यांच्या पहिल्या पत्नीने त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. यानंतर राहुलचा नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयंवर झाला, ज्यामध्ये त्याला डिम्पी गांगुली पत्नीच्या भूमिकेत मिळाली, पण लग्नाच्या ५ वर्षानंतर डिम्पीनेही राहुलवर गंभीर आरोप करत त्याच्यापासून घटस्फोट घेतला. यानंतर, २० नोव्हेंबर २०१८ रोजी राहुलने कझाकिस्तानची मॉडेल नताल्या इलिनाशी लग्न केले, दोघांच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत आणि दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनाचा खूप आनंद घेत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा