Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मी काही मॅराथॉन धावणार नाही’, म्हणत हाय हिल्सवरून ट्रोल करणार्‍यांना देबिनाने दिले सडेतोड उत्तर

हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि छोट्या पडद्यावरील कलाकार त्यांच्या चित्रपटांइतकेच सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा होताना दिसत असते. या अभिनेत्रींच्या अनेक फोटो वर त्यांचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत असतात तर कधी उपदेशाचे डोस देखील पाजत असतात. असाच अनुभव प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीला( pooja Banerjee) आला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी सध्या तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनी ती लवकरच आई होणार आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. कधी ती कधी बेबी बंप तर कधी पती गुरमीत चौधरीसोबत डान्स करतानाचे फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये गुरमीत तिची सँडल घालताना दिसत आहे. गरोदरपणात अशा उंच टाचेचा सँडल घातल्यामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले होते, पण आता तिने या ट्रोल करणार्‍या लोकांची चांगलीच शाळा घेतली आहे, तसेच मी काही मॅराथॉन मध्ये धावणार नाही असा इशाराही तिने दिला आहे.

खरे म्हणजे, चाहते देबिना बॅनर्जीबद्दल चिंतित आहेत आणि तिला हाय हिल्स न घालण्याचा सल्ला देत आहेत, कारण ते मुलांसाठी हानिकारक असू शकते. सर्व फोटोंमध्ये ती हिल्स घातलाना दिसत आहे. त्यामुळेच तिचे चाहते कमेंट करत तिला हील्स न घालण्याचा सल्ला देत आहे आहेत. आता अभिनेत्रीने नुकतेच तिच्या व्लॉग्सवर याबद्दल उत्तर दिले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना देबिना म्हणाली की, “मला माहित आहे की डॉक्टरांपासून ते सामान्य लोक मला सल्ला देत आहेत. पण कारण देखील काहीतरी लागते. मी फक्त हील्स घालून उभा राहिले आणि फोटोशूट केले. गुरमीतने मला ती हिल्स घालण्यास मदत केली आणि आम्ही व्हिडिओ शूट केला. मी ना रस्त्यावर पळाले ना तो घालून करून चालले. त्यामुळे कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा. हायपर होऊ नका आणि असा विचार करू नका की मी हील्स घालून मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. ” दरम्यान या व्हिडिओमध्ये अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, अशा अवस्थेत उंच हिल्स घालू नका. त्याच बरोबर अनेकांनी कृपया हील्स घालू नका हे गरोदरपणात धोकादायक आहे. असा सल्ला तिला दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा