Monday, October 13, 2025
Home टेलिव्हिजन ‘पाच किलोचा हार, ‘अमीरी’ पँट’ इंडियाज गॉट टॅलेंटच्या सेटवर श्रीमंतीच्या मर्यादा ओलांडताना दिसले परीक्षक

‘पाच किलोचा हार, ‘अमीरी’ पँट’ इंडियाज गॉट टॅलेंटच्या सेटवर श्रीमंतीच्या मर्यादा ओलांडताना दिसले परीक्षक

सोशल मीडियावर मोठ्या स्वरूपात सक्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा सतत तिचे व्हिडिओ, फोटो तिच्या शूटिंगच्या सेटवरील फनी व्हिडिओ शेअर करताना दिसते. सध्या शिल्पा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त लोकप्रिय ठरत असलेल्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोचे परीक्षण करत आहे. या शोच्या सेटवरील तिचे अनेक फनी व्हिडिओ सोहसील मीडियावर तुफान व्हायरल होतात. शूटिंगच्या मधल्या काळात ती किरण खेर, बादशहा आणि मनोज मुंतशीर या तिच्या साथीच्या परीक्षकांसोबत नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ तयार करत असते आणि ते सोशल मीडियावर शेअर करते.

अशातच आता याच शोच्या सेटवरील एक नवीन व्हिडिओ शिल्पा शेट्टीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा, किरण खेर, बादशाह आणि मनोज मुंतशीर यांच्यासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा किरण खेर आणि बादशहा यांच्या श्रीमंतीबद्दल सर्वांना सांगताना दिसत आहे. शिल्पा नेहमीच या शोच्या ब्रेकटाईममध्ये असे व्हिडिओ बनवते. या व्हिडिओमध्ये मुख्य आकर्षण असते ते किरण खेर यांचे. त्यांचा हजरजबाबीपणा नेहमीच प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे शिल्पाचे हे व्हिडिओ अधिकाधिक गाजताना दिसतात.

या नव्या व्हिडिओमध्ये शिल्पा किरण खेर यांना उद्देशून म्हणते की, “हे दृश्य इंडियाज गॉट टॅलेंटच्या सेटवरील आहे.” किरण खेर यांच्याकडे इशारा करून म्हणते की, “ही श्रीमंतीची मर्यादा बघा. चक्क अडीच किलोचा हार घातला आहे.” यावर किरण खेर म्हणतात, “अडीच किलो नाही तर पाच किलोचा घातला आहे. तू घालून बघ.” यावर बादशाह म्हणतो की, “सनी देओल यांचे दोन्ही हातच घालते तुम्ही.” हे ऐकून ते चारही जज जोरजोरात हसतात.

पुढे शिल्पा बादशाहकडे इशारा करते आणि म्हणते, “लॅम्बॉरगिनी (सर्वात महाग गाडी) खरेदी करूनही यांच्या पॅन्टवर ‘अमीरी’ लिहण्याची गरज आहे.” त्यावर किरण खेर त्याच्या फाटलेल्या जीन्सच्या स्टाइलकडे पाहून म्हणते, “हीच गरिबी आहे.” त्यानंतर शिल्पा मनोज यांना म्हणते, “इथे आपणच गरीब आहोत.” शिल्पाचा हा व्हिडिओ तुफान गाजत असून, नेटकऱ्यांचा देखील त्यावर भन्नाट कमेंट्स येत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा