Monday, February 24, 2025
Home साऊथ सिनेमा ‘केजीएफ २’च्या ट्रेलर लॉचिंगची धुरा करण जोहरच्या हाती, ‘या’ दिवशी रिलीझ होणार चित्रपट

‘केजीएफ २’च्या ट्रेलर लॉचिंगची धुरा करण जोहरच्या हाती, ‘या’ दिवशी रिलीझ होणार चित्रपट

साल २०१८ मध्ये आलेल्या ”केजीएफ चॅप्टर १’ चित्रपटाने सिनेसृष्टीत जोरदार धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्याचबरोबर कन्नड सुपरस्टार यशच्या (Yash) जबरदस्त अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले होते. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड केले होते. तेव्हापासून प्रेक्षकांना ‘केजीएफ २’ची आतुरता लागली आहे. या चित्रपटात तर प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाचा एक ग्रँड ट्रेलर प्रदर्शित करण्याचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. ज्याचे सुत्रसंचालन निर्माता करण जोहर (Karan Johar) करणार आहे. 

सुपरस्टार यशचा बहुचर्चित ‘केजीएफ चॅप्टर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीझसाठी निर्मात्यांनी २७ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. त्यानंतर लगेच काही दिवसात म्हणजेच १४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. कन्नड भाषेत असणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर करण जोहर प्रदर्शित करणार आहे. याबद्दलची माहिती सांगताना ते म्हणाले की, “भारतीय मनोरंजन क्षेत्रात सगळ्यात मोठ्या सत्तापालटाचा साक्षीदार बनणार आहे, जेव्हा केजीएफ २ च्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण जोहर करेल.” तसेच रॉकी भाईला त्याचे जग सापडेल का? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

दरम्यान ‘केजीएफ चॅप्टर २’ मध्ये सुपरस्टार यश आणि संजय दत्त यांच्यासोबत अभिनेत्री रवीना टंडनही झळकणार आहे. जिथून ‘केजीएफ १’चा शेवट झाला तिथूनच या चित्रपटाच्या कथेला सुरूवात होणार आहे. चित्रपटात अभिनेता यश आणि संजय दत्त यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची आता प्रेक्षकांना आतुरता लागली आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा