Sunday, February 23, 2025
Home टेलिव्हिजन खरंच की काय! ‘द काश्मिर फाइल्स’च्या वादानंतर लवकरच बंद होऊ शकतो कपिल शर्माचा शो

खरंच की काय! ‘द काश्मिर फाइल्स’च्या वादानंतर लवकरच बंद होऊ शकतो कपिल शर्माचा शो

‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याने कपिल शर्माचा(Kapil sharma) कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला होता. कपिलच्या या निर्णयानंतर त्याच्यावर चौफेर टिका झाली होती. यावेळी ट्विटरवर कपिल शर्माच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचीही मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे कपिल शर्मा आणि ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपट वाद चांगलाच रंगला होता. हा वाद आता कसाबसा मिटल्याची चिन्हे दिसत असतानाच या कार्यक्रमाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. कपिल शर्माचा कार्यक्रम बंद होणार असल्याचे दिसत आहे. 

‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय आहे. घराघरात या कार्यक्रमाला जोरदार पसंती दर्शवली जाते. कार्यक्रमातून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन होते. त्यामुळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या कार्यक्रमाला पसंत करतात. कार्यक्रमातील कपिल शर्माच्या विनोदी शैलीचे तर नेहमीच कौतुक होत असते. मात्र सध्या त्याच्या एका पोस्टवरून हा कार्यक्रम लवकरच बंद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. कपिल शर्माने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन अमेरिका- कॅनेडा दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ही पोस्ट शेअर करताना कपिलने लिहिले की, “२०२२ मध्ये माझ्या यूएस-कॅनडा टूरची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. लवकरच भेटू. हा दौरा ११ जूनपासून सुरू होणार असून ३ जुलैपर्यंत चालणार आहे.” कपिलच्या या पोस्टमुळे लवकरच हा शो काही काळासाठी बंद केला जाईल अशी शक्यता बांधली जात आहे. मात्र, त्यानंतर हा शो पुन्हा नव्या सीझनसह परतणार आहे. कपिल व्यतिरिक्त ‘द कपिल शर्मा शो’मध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि अर्चना पूरण सिंग हे दिग्गज कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

दरम्यान ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना कपिल शर्मा शोमध्ये त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी विचारले असता त्यांनी सांगितले की, चित्रपटात मोठे स्टार नसल्यामुळे मला शोमध्ये आमंत्रित करण्यात आले नाही. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अनुपम खेर यांनी कपिलच्या बचावासाठी येऊन, आमंत्रण मिळाले होते तरी मात्र अशा संवेदनशील चित्रपटाचे प्रमोशन या कार्यक्रमात करणे योग्य नाही, त्यामुळे ते स्वीकारले गेले नव्हते असा खुलासा केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा